शिरपूर तालुक्यातील गदडदेव येथे मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस साजरा

 शिरपूर तालुक्यातील गदडदेव येथे मोठ्या उत्साहात आदिवासी दिवस साजरा

बोराडीदि.१०(प्रतिनिधी):- शिरपूर तालुक्यातील डोंगर रांगेत वसलेले गदडदेव येथे विश्व आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी प्रमुख पाहुणे भिल समाज विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष दिपकजी अहिरे होते 

सर्व प्रथम विर एकलव्य व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व सत्कार सोहळा नंतर दिपक दादा अहिरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले आपण आपली आदिवासी संस्कृती जोपसत असताना दारु सिगरेट तंबाखू या व्यसनापासून दूर राहायला पाहिजे व्यसन करायचेच असेल तर शिक्षणाचे (अभ्यास) करा खेळाचे करा आपली संस्कृती आपली पंरपराचे करा व आपल्या शुभकार्यात आपले आदिवासीचे वाद्य सिबली, ढोल, तारपाचा उपयोग करा

तसेच सरपंच आत्माराम अहिरे यांनी जे आपले आदिवासी विद्यार्थी १०वीत व १२ वीत ८० च्या पुढे टक्के पाडतील त्यांना पाच हजार रोख रक्कम देण्याचे सांगितले व बिरसा ब्रिगेड चे धुळे जिल्हा सहकार्य अध्यक्ष रोहिदास पाडवी यांनी ही मनोगत व्यक्त केले त्यात आदिवासीच्या जल जमिन या सह विस्थापण बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, संपत्तीचा विनाश, आणि त्याचा आदिवासी जनजिवनावर झालेला परीणाम या विषयी आपले मौलीक विचार मांडले 

तसेच आदिवासी जेष्ठ नेत्या कस्तुरबाई बागुल ् यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की आपण आदिवासी गौरव दिवस का साजरा करतो आदिवासी गौरव दिवस का म्हणतो, आदिवासी दिनाचे महत्त्व काय, या बाबत अनमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास पाडवी यांनी केले कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव व  ग्रामस्थ उपस्थित होते 

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भिल समाज विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष दिपक दादा अहिरे (शिंदखेडा)चंदु दादा भिल नगरसेवक शिंदखेडा, अशोक सोनवणे, नगरसेवक दोंडाईचा भिल समाज विकास मंच चे शिंदखेडा तालुका युवा अध्यक्ष बापुसाहेब ठाकरे (रंजाणे), युवा नेते अशोक ठाकरे(रंजाणे)

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल पाडवी (पोलीस पाटील गदडदेव) रोहिदास पाडवी (बिरसा ब्रिगेड जिल्हा सहकार्य अध्यक्ष) आत्माराम अहिरे (सरपंच गदडदेव) शांतीलाल पटले (सामाजिक कार्यकर्ता गदडदेव) किलसिंग मोते, संग्राम ससत्या, तुळशिराम चव्हाण, सतीलाल शिंदे, मोजु पाडवी, शिवदास ठाकरे, आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशीय सेवा भावी संस्था चे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ शिरसाठ (पत्रकार)भाऊराव पवार, पिटुं निगवाल, बाबुराव पाडवी, दारासिंग पाडवी, नारायण बागुल, दिपक सोनवणे, आदिनी परीश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने