राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे चहार्डी येथे आदिवासी दिन साजरा.. ♦️सरपंच चंद्रकलाताई यांनी घेतला पुढाकार

 राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे चहार्डी येथे  आदिवासी दिन साजरा..

♦️सरपंच चंद्रकलाताई यांनी घेतला पुढाकार.

चोपडा,दि.१०(प्रतिनिधी):--तालुक्यातील चहार्डी या गावी सरपंच चंद्रकलाताई पाटील यांच्या वतीने व ग्रामपंचायत मार्फत 9ऑगस्ट जागतिक आदिवासी दीन व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)यांच्या तर्फे वृक्षारोपण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा मोठ्या उत्साहात सम्पन्न झाला.यावेळी आदिवासी चे श्रद्धास्थान असलेले बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच चंद्रकलाताई पाटील यांनी  आदिवासी समुदाय आहे म्हणून जंगल शिल्लक आहे,आदिवासी समाजाची महिला महामहिम राष्ट्रपती पदी द्रौपदी मुर्मु विराजमान आहे ही भारताची शान आहे.असे गौरव उदगार काढले.

  याप्रसंगी माजी झेड पी सदस्य सुनील पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार नेते व जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, घनश्याम अग्रवाल,जेष्ठ नेते प्रवीण भाई गुजराथी,तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील,जिल्हा संघटक परेश देशमुख, शहर अध्यक्ष गिरीश देशमुख,माजी चोसाखा संचालक निलेश पाटील,सामाजीक न्याय विभाग शहर अध्यक्ष मिलिंद सोनवणे,यवक अध्यक्ष शुभम सोनवणे,राष्ट्रवादीचे मुकेश पाटील,किरण मोरे,स्वाती बडगुजर, सविता पाटील,सिंधू पाटील,सुधाकर पाटील,जंगलू भिल,सीताराम बारेला,रुमालीया बारेला,दुर्योधन भिल,बाबूलाल भिल,भुषण पाटील,अर्जुन कोळी,खंडेराव पाटील,बाळू पाटील,संतोष पाटील,निंबा पाटील,किलेंर बारेला व चहार्डी गावातील ग्रामस्थ महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पाटील यांनी तर आभार भरत पाटील यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने