गणपुर ला आदिवासी दिनाची धूम, प्रतिमांची मिरवणूक

 गणपुर ला आदिवासी दिनाची धूम, प्रतिमांची मिरवणूक

गणपूर (ता चोपडा)  आदिवासी दिनाच्या मिरवणुकीत सहभागी झालेले आदिवासी बांधव

गणपूर (ता चोपडा)ता 9:   येथे आदिवासी दिनाच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी आदिवासी बांधव आपापली पारंपरिक शस्रे घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत विर एकलव्य व आदिवासींचे आदर्श असलेल्या समाज धुरीणांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.सायंकाळी लासूर रस्त्यावरील वीर एकलव्य यांच्या प्रतिमा असलेल्या स्मारका पासून मिरवणुकीला सुरुवात झाली ,त्यावेळी सहभागी झालेले बांधाव बँड च्या तालावर नाचत साहित्य सोबत घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते.रात्र होई पर्यंत ही मिरवणूक सुरू होती त्यात महिला,पुरुष व तरुणांनी सहभाग घेतला..... 




.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने