जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2025 इयत्ता 6 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरणे सुरु

 

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2025 इयत्ता 6 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरणे सुरु     

जळगाव, दि.  (प्रतिनिधी) :- दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जवाहर नवोदय विद्यालयातील इयता 6 वी च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात जुलै 2024 पासून झालेली आहे. प्रवेश परिक्षा अर्ज हे पूर्वी प्रमाणे फक्त ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर, 2024 असून ही परीक्षा (शनिवार) दिनांक 18 जानेवारी 2025  ला  निर्धारित केलेल्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर वेळ 11.30 ते 1.30  या कालावधीत होईल, सदर परीक्षेचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज  लिंक www.navodaya.gov.in वर उपलब्ध आहे. सर्व संबंधितांनी माहिती पत्रक काळजीपूर्वक वाचून चालू वर्षी इयत्ता 5 वी मधे शिकत असलेले सर्व विद्यार्थी ( अटी पूर्ण करणारे ह्या प्रवेश परीक्षेस ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. 

सदर माहिती जिल्ह्यातील सर्व इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी व संबंधीत पालक शिक्षक, मुख्याध्यापक व गट शिक्षणाधिकारी यांना आपल्या मार्फत अवगत करावी असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. अंभोरे यांनी केले आहे. अधिक माहितीमाठी  बी. आर. द्विवेदी  9४२२७९७११०, हर्षद पवार ९९२१२९७९५१ यांच्याशी संपर्क साधावा. मागील वर्षी १२१०० विद्यार्थी सदर परिक्षेस  प्रविष्ट झाले होते या वर्षी कमीत कमी २०% प्रविष्ठ विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी असे आवाहन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव भुसावळ यानी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने