समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे महसूल सप्ताह संपन्न

 समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे महसूल सप्ताह संपन्न 

   चोपडा दि.३(प्रतिनिधी) भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे भगिनी मंडळ चोपडा शैक्षणिक संकुलातील समाजकार्य महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय, ललित कला महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र या शैक्षणिक विभागांनी आणि चोपडा तालुका महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर होते. प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून चोपडा तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, महसूल नायब तहसीलदार आर आर पाटील, निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील, प्रा. आर ए पाटील होते. 

       यावेळी विचारपीठावर उपप्राचार्य प्रा.डॉ. आशिष गुजराथी, ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील बारी, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. संजय चौधरी, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य उदय ब्रम्हे आदी मान्यवर उपस्थित होते. 

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदांणकर यांनी केले. महसूल नायब तहसीलदार आर.आर.महाजन यांनी विविध योजनांची माहिती दिली. प्राचार्य आर.ए.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत अवगत केले. निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी महाराष्ट्र शासन राबवीत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या योजना व्यवस्थेतील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग नोंदवावा असे सूचित केले. कोणताही प्रकारच्या दाखल्यासाठी महसूल विभाग तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

         यावेळी प्रा.डॉ. संबोधी देशपांडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील गरजू आणि गुणी दोन विद्यार्थिनींना मदत करण्यासाठी प्रत्येकी रुपये पाच हजाराचा धनादेश दिला. प्रा.डॉ.विनोद रायपुरे यांनी शिवीमुक्त समाज व्यवस्थेची निर्मिती होण्यासाठी सर्वांना शिव्या न देण्याची शपथ दिली.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. राहुल निकम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अनिल बाविस्कर यांनी केली. या कार्यक्रमासाठी भगिनी मंडळ शैक्षणिक संकुलातील वरिष्ठ महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने