शिष्यवृत्ती परीक्षेत प्रताप विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांची जोरदार चमक

 शिष्यवृत्ती परीक्षेत प्रताप विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांची जोरदार चमक 

चोपडा दि.७(प्रतिनिधी)चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित,प्रताप विद्या मंदिराचे इ.5 वी व 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत (23-24)  जिल्हा गुणवत्ता यादीत 5  विद्यार्थ्यांनी  चमक दाखवली आहे. गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे चि.सुराणा आयुष राकेश ,कु.पाटील ज्ञानवी सुदर्शन ,कु.जैन आरुही दिनेश,कु.चौधरी रिया श्रावण,चि.पाटील समर्थ महेंद्र  कु. बाविस्कर, गार्गी प्रसाद (इ.8 वी)  या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, यांच्या हस्ते व संस्थेच्या सेक्रेटरी माधुरीताई मयूर यांच्या उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमात पालकांसह कौतूक व अभिनंदन करण्यात आले . अध्यक्षिय भाषणात संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी विद्यार्थ्यांना प्रयत्न करत रहाण्याचे , शिक्षकांक्षी चर्चा करून पुढे इतर परीक्षेत यश मिळवण्याचे मार्गदर्शन केले .

यावेळी चोपडा एज्यूकेशन सोसायटीचे श्री जैन काका संचालक श्री भूपेंद्रभाई गुजराथी, श्री गोविंदभाई गुजराथी , शाळेचे मुख्याध्यापक श्री.पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक श्री पी डी पाटील , उपप्राचार्य श्री जे एस शेलार पर्यवेक्षिका श्रीम.माधुरी पाटील मॅडम, पर्यवेक्षक श्री एस एस पाटील सर, श्री अतुल भट सर उपस्थित होते . सर्वांनी विद्यार्थ्यांचे  कौतुक व अभिनंदन केले. तसेच या सर्व यशस्वी विदयार्थ्यांना श्री. सी.बी. बाविस्कर, श्री. बी. ए. पाठक, सौ. डी. एस. शाह, कु. पी.एस. ठाकरे, श्री. के. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केलेले आहे. ईशस्तवन व स्वागतगीत श्री पंकज नागपूरे व प्रदिप कोळी सर व गानसमुहाने सादर केले.आभार श्री पी डी पाटील यांनी मानले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. वाय. ए . बोरसे यांनी केले .या दिमाखदार सोहळ्यात सर्व विभागाचे शिक्षक बंधू, भगिनी लेखनिक कर्मचारी बंधू उपस्थित होते. 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने