केन्द्रीय राज्यमंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांचा उद्या चोपडयात भव्य नागरी सत्कार

 केन्द्रीय राज्यमंत्री ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांचा उद्या चोपडयात भव्य नागरी सत्कार

  चोपडा दि.५(प्रतिनिधी)रावेर लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांचा चोपडा तालुक्यात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दि. 6 जुलै शनिवार रोजी चोपडा विधानसभा क्षेत्रात प्रथमच आगमन होत आहे त्या निमित्त चोपडा तालुका व शहर भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पदाधिकार्‍यांकडून  'नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे..

    *नियोजित दौरा-*

*सकाळी -* 9:30 वा. धानोरा

           10:30 वा. पंचक

           11:00 वा. लोणी

           11:30 वा. अडावद

*दुपारी -* 1:00 वा. भाजपा कार्यालय- 

             कस्तुरी निवास विद्याविहार काॅलनी 

    1:30 वा. रॅली-  शासकीय विश्रामगृह ते छ.शिवाजी महाराज चौक चोपडा..

   2:00 वा.  'संस्कार मंडपम्' - नागरी सत्कार कार्यक्रम..

     तरी चोपडा तालुका व शहर भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या पदाधिकारी  सर्व  आजी - माजी लोकप्रतिनिधी, जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्ते, नागरिक बंधु - भगिनींनी सर्वांनी शहरातील 'संस्कार मंडपम्' हाॅल येथे 'नागरी सत्कारासाठी  उपस्थिती द्यावी असे आवाहन भारतीय जनता पार्टी व महायुतीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी (अ.प.), म.न.से. आर.पी.आय. रा.स.प. प्रहार चोपडा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे..*

 राज्याचे  युवक आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे हया शनिवार , दिनांक 6 जुलै, 2024 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.

            शनिवार दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 9.00 वाजता मुक्ताईनगर येथून वाहनाने चोपडा        जि. जळगाव कडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता  चोपडा जि. जळगाव येथे आगमन, दुपारी 12.00 वाजता चोपडा तालुक्यात व शहरात नागरीकांच्या बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 6.00 वाजता चोपडा जि. जळगाव येथून वाहनाने जळगाव कडे प्रयाण, रात्री 8.30 वाजता जळगाव येथे आगमन राखीव व मुक्काम

            रविवार दिनांक 7 जुलै, 2024 रोजी सकाळी 9.00 ते 12.00 वाजता जळगाव येथे महाराष्ट्र लेवापाटीदार महासंघाच्या कार्यक्रमांस उपस्थिती, दुपारी 12.00 वाजता जळगाव येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने