अंगणवाडी कर्मचारी भगिनींना पगार वाढ न मिळाल्यास आंदोलन : काॅ. अमृत महाजन यांचा इशारा

 अंगणवाडी कर्मचारी भगिनींना पगार वाढ न मिळाल्यास आंदोलन : काॅ. अमृत महाजन यांचा इशारा 



 चोपडा...दि.७(प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर "*लाडकी बहिण योजना* आणून पासष्ट वयापर्यंतच्या महिलांना दरमहा दीड हजार रुपयाची मानधन जाहीर केलेले आहे. त्यासाठी दोन महिन्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे व 31 ऑगस्ट पर्यंत योग्य ते कागदपत्र घेऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य करायचे आहे. असे म्हटलेले आहे. परंतु गेल्या वर्षी अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढीसाठी संप केला होता.   त्याच बरोबर आशा वर्कर गटप्रवर्तक यांचाही संप झाला. आशा वर्कर गटप्रवर्तक यांना  मानधन वाढ केली की अंगणवाडी सेविका मदत निश यांनाही मानधन वाढ देण्यात येईल असे आश्वासन दिले.. त्यानुसार गेल्या 14 मार्च रोजी आशा वर्कर गतप्रवर्तक यांना मानधन वाढीचा जीआर काढून नोव्हेंबर 2023 पासून देण्याच्या  आदेशही काढला त्यातही आशा कर्मचारी भगिनींना बऱ्यापैकी मानधन वाढ तर गटप्रवर्तक यांना तुटपुंजी वाढ दिली त्यामुळे त्या सरकारवर नाराज आहेत. परंतु अंगणवाडी सेविका मदतनिसांना मानधनवाढ  देण्या संदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही. अन दुसरीकडे शासनाच्या लाडकी बहीण योजना अंमलबजावणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांमदतनीसचे भरवशावर  आहे. अंगणवाडी चे काम बाजूला चालून या कामाकडे सेविका मदतनीस यांना झोकुन घ्यावे लागणार आहे.. अंगणवाडी सेविका मदतनीस या देखील महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहिणी आहेत आणि म्हणून त्यांना भरीव मानधन वाढ व गेल्या त चार-पाच वर्षापासून ज्या सेवानिवृत्त झाल्यात त्यांना सेवानिवृत्ती लाभ सेविका एक लाख रुपये मदतनीस 75 हजार रुपये मिळाला नाही पेन्शन बाबत निर्णय नाही. मोबाईल हाताळणीच्या प्रोत्साहन भत्ता इतर मागण्या प्रलंबित आहेत तरी सरकारने या मागण्यांबाबत या विधानसभा निवडणुकीत त्वरित निर्णय घ्यावा. जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन चे सरचिटणीस कॉम्रेड अमृत महाजन यांनी केले आहे त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णय न झाल्यास  अंगणवाडी कर्मचारी भगिनी यांचे आंदोलन छेडण्याचा इशारा  कॉ. अमृत महाजन यांनी दिला आहे. येत्या नऊ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे कृती समितीचे नेते दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख शुभा शमीम, कामगार संघटना नेत्यांना महाराष्ट्र सरकारने चर्चेसाठी बोलावलेले आहे .यात निर्णय होईल अशी अपेक्षा का अमृत महाजन यांनी व्यक्त केली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने