नगर वाचन मंदिरात आज रात्री ८ वाजता 'पाऊस शब्दसरी

 नगर वाचन मंदिरात आज रात्री ८ वाजता 'पाऊस शब्दसरी'


चोपडा दि.७(प्रतिनिधी)आषाढ मासारंभ अर्थात  कविकुलगुरू कालिदासांच्या स्मरणानिमित्त चोपडेकर रसिकांसाठी मराठी साहित्यातील विविध नामवंत कविंच्या संकलित पाऊस कवितांचा *'पाऊस शब्दसरी'* हा कार्यक्रम आयोजित केला आहे .

 विलास पाटील खेडीभोकरीकर यांची संकल्पना , कवी अशोक नी.सोनवणे यांचे मार्गदर्शन व संजय बारी यांच्या निवेदनातून साकारणारा हा कार्यक्रम उदया दि . ७ जुलै २४ रविवार रात्री ८ - ०० वा. अमरचंद सभागृह,नगर वाचन मंदिर , गांधी चौक, चोपडा येथे होणार आहे . 

तरी या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रम  *आयोजक संस्था नगर वाचन मंदिरचे* अध्यक्ष- आशीष गुजराथी, कार्यवाह गोविंद गुजराथी , *अखिल भारतीय साहित्य परिषद चोपडा* शाखाध्यक्ष व कार्याध्यक्ष अनुक्रमे अशोक सोमाणी - गोविंद गुजराथी, कार्यवाह प्रभाकर महाजन, तसेच *मसाप चोपडा* शाखाध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष - प्राचार्य राजेंद्र महाजन ,कार्याध्यक्ष - विलास पाटील , प्रमुख कार्यवाह संजय बारी या पदाधिका-यांनी केले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने