'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा चोपडा मतदार संघातील माता-भगिणींनी लाभ घ्यावा - सौ. आशाबाई रविंद्र पवार

 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचा चोपडा मतदार संघातील माता-भगिणींनी लाभ घ्यावा - सौ. आशाबाई रविंद्र पवार 

चोपडा,दि.४(प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महाराष्ट्राच्याभाजप-शिवसेना राष्ट्रवादी युती सरकारच्या योजनेचा चोपडा मतदार संघातील सर्व पात्र माता-भगिणींनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ. आशाबाई रविंद्र पवार यांनी केले आहे.

राज्यातील श्रमबल पाहणी नुसार पुरुषांचे रोजगाराची टक्के ६० टक्केचे जवळपास तर स्त्रियांची केवळ २८ टक्के असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनेमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार असून त्यांच्या बँक खात्यात दरमहा शासनाच्या वतीने १५०० रूपयांची मदत पाठविण्यात येणार आहे. लाभार्थ्याचे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्नाची अट नसून चोपडा मतदार संघातील या योजनेस पात्र सर्व माता-भगिणींनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चोपडा तालुका भाजपा महिला तालुकाध्यक्षा  ,  सौ. आशाबाई रविंद्र पवार यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने