सावखेडा उपकेंद्रात गुंडाशाही करणारा तो दादा कोण? जखमी युवकावर शिवीगाळ करून उगारली खुर्ची गावकऱ्यांत संताप

 सावखेडा उपकेंद्रात गुंडाशाही करणारा तो दादा कोण? जखमी युवकावर शिवीगाळ करून उगारली खुर्ची गावकऱ्यांत संताप 


चोपडा ,दि.३( प्रतिनिधी ) --- चोपडा व अमळनेरच्या सीमेवर असलेल्या सावखेडा उपकेंद्रात एका युवकाला अंगठ्याला किरकोळ लागले होते त्याच्या ड्रेसिंगसाठी घेऊन जाणाऱ्या युवकावर त्या उपकेंद्राला बसलेल्या इसमाने शिवीगाळ करत खुर्ची उचलून मारण्यासाठी उगारली होती याबाबत अनेकांच्या मनात संताप निर्माण झाला आहे.

              सविस्तर असे की, परवा सावखेडा उपकेंद्रावर दोन युवक गेले असता त्यातील एका युवकाला अंगठ्याला लागले होते त्या अंगुठयाचे ड्रेसिंगसाठी गेले असता तिथे डॉक्टर बाबत विचारणा केली असता तिथे बसलेला इसमाने नाही म्हटले मग ड्रेसिंग कोण करून देणार ? असे विचारले तर संबंधित इसमाला राग आला यावरून येथे काही शिल्लक नाही ड्रेसिंग होणार नाही असे म्हटले. नंतर समोरील इसमाने व्हिडीओ शुटिंग करत आहोत हे दाखविले आणि विचारणा केली असता त्यांचा राग येऊन उपकेंद्राला बसलेला संबंधित इसमाने शिवीगाळ करत तेथे असलेली प्लस्टिक खुर्ची उचलून त्या युवकाला मारण्यासाठी उगारली अधिक तपास केला असता संबंधित इसम हा कुठेही नोकरीला नाही त्याची धर्मपत्नी त्या उपकेंद्राला सिस्टर असल्याचे समजते.  सदरील सिस्टरच्या जागेवर तिचा पती बसलेला होता आणि तो माणूस आलेल्या पेशंटला खुर्ची व शिवीगाळ पर्यंत मजल मारतो इतकी दादागिरी कशी वरीष्ठ अधिकारी सहन करत आहेत? यांच्यावर कड़क कारवाई होईल का? असा सवाल संबंधित इसमाने केला आहे.

--------------------------------------

कारणे दाखवा नोटीस बजावणार -- तालुका वैधकीय अधिकारी 

संबंधित इसमानेची चौकशी करू व तेथील डॉक्टर डॉ. अनिल चौधरी  व  गीते सिस्टर यांना कारणे दाखवा नोटीस बाजविण्यात येणार आहे. आणि तसा अहवाल जिल्हा वैधकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल असे ही अमळनेर तालुका वैधकीय अधिकारी डॉ गिरीष गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले 

-----------------------------------------

चौकशी होणारच -- डॉ. पवार 

संबंधित इसम उपकेंद्राचा कर्मचारीच नाही आणि उपकेंद्राला येऊन का बसतो आणि येथे बसण्याचे अधिकार त्याला कोणी दिले? याबाबत सविस्तर चौकशी होईल आणि कारणे दाखवा नोटीस देखील बजविण्यात येणार आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्यावर निश्चितच कारवाई होईल असे पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. विशाल पवार यांनी दूरध्वनी वरून सांगितले

---------------------------------------------------

संबंधित आलेले पेशन्ट हे सावखेडा उपकेंद्राला हुज्जत घालत होते त्यामुळे असा प्रकार झाल्याचे गावातील लोक सांगत आहे असे सावखेडा उपकेंद्राचे अधिकारी  डॉ. अनिल चौधरी यांनी सांगितले यावरून पत्रकाराने प्रति प्रश्न केला की, मग काय मारण्याच्या उद्देशाने खुर्ची  उचलून धरायची आणि शिवीगाळ करायची का? यावरून मी मोटारसायकलवर आहे. थोड्या वेळाने बोलतो असं सांगून फोन कट केला.त्यांनतर तर फोनच आला नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने