चोपडा तालुक्यातील तीन शिक्षकांचा राजर्षी छत्रपती शाहू राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सम्मान

 चोपडा तालुक्यातील तीन शिक्षकांचा राजर्षी छत्रपती शाहू राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सम्मान

चोपडा दि.३(प्रतिनिधी ):तालुक्यांतील तीन जिल्हा परिषद शिक्षकांना अविष्कार सोशल अण्ड एज्युकेशनल फाउंडेशनकोल्हापूर यांच्या वतीने देण्यांत येणारा या वर्षाचा लोकराजा राजर्षी शाहू गौरव राज्यस्तरीय पुरस्कार- २०२४ मिळाला आहे. आहे.

      अविष्कार फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षीसामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव राजर्षी शाहू महाराजांच्या २६ जून जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय व राज्यस्तर पुरस्काराच्या रूपाने सन्मानित करण्यांत येते यावर्षी विरवाडे जि.प.शाळा मुख्याध्यापक अकबर समशेर तडवी, जि.प.शाळा न्यू.प्लॉट शाळेचे मुख्याध्यापक भरत भिमराव शिरसाठ,जि.प.शाळा मुळ्यातार शाळेचे शिक्षक निवृत्ती अशोक पाटील सर हे शिक्षक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करित आहेत,त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक  शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडले आहेत.त्यांचा या कामगिरीचा गौरव योग्य पुरस्काराने कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज स्मारक सभागृहात इसरो (भारत)माजी अभियंता नगिनभाई प्रजापती यांच्या हस्ते व जेष्ठ लेखक कवी प्राचार्य किसनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमास अविष्कार संस्थेचे अध्यक्ष संजय पवार ,डॉ. एम.बी शेख,प्रकाश चौधरी,दत्तात्रय सुर्यवंशी,रंगराव सुर्यवंशी,स्नेहल खंकाळ,शशिकांत म्हेत्तर प्रमुख पाहुणे व पदाधिकारी उपस्थित होते.

       अविष्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी या तिन्ही शिक्षकांचे कामाची दखल घेवून निवड समिती मार्फत पडताळणी करून यांचा कार्याचा गौरव केला. सदर पुरस्कार दि.३०जून २०२४ रोजी कोल्हापूरातील लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन येथे  विशेष अतिथी व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यांत आला. मुख्याध्यापक भरत शिरसाठ सरांना १५ राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारमिळाले आहेत, ते भारतीय बौद्ध महासभा या सामाजिक व धार्मिक संस्थेचे चोपड़ा शहर अध्यक्ष आहेत.व शैक्षणिक कर्मचारी कास्ट्राईब संघटनेचे चोपडा तालुका अध्यक्ष सुद्धा आहेत.

      लोकराजा राजर्षी शाहू गौरव राज्यस्तरीय पुरस्कार स्विकारण्यास ते व त्यांच्या सोबत निवड समिती सदस्य प्रमोद पाटील,विजय कचवे तसेच रविंद्र शिरसाठ,ऋषीकेश धनगर , शिवाजी आव्हाड,भालचंद्र ठाकरे,प्रताप पावरा,शरद पाटील हे उपस्थित होते. 

      या तिन्ही जि.प.शिक्षकांना पुरस्कार मिळाल्या बद्दल रमेश वाघ गटविकास अधिकारी पं.स. चोपडा,अविनाश पाटील गट शिक्षणाधिकारी,नरेंद्र सोनवणे गटसमन्वयक,अजित पाटील केंद्रप्रमुख आडगांव,विश्वनाथ पाटील केंद्रप्रमुख नागलवाडी,यांनी भरत शिरसाठ , अकबर तडवी,निवृत्ती पाटील यांचे अभिनंदन केले.विविध सामाजिक,शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारीनी शुभेच्छा देवून सत्कार केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने