विकास विद्यालयात संस्था वर्धापन दिनी सायकल वाटप व बक्षीस वितरण

 विकास विद्यालयात संस्था वर्धापन दिनी सायकल वाटप व बक्षीस वितरण 


गणपूर ,ता .चोपडा दि.18(प्रतिनिधी):  येथील विकास माध्यमिक विद्यालयात शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा 80 वा वर्धापन दिन सायकल वाटप व बक्षीस वितरण करून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कूलच्या प्राचार्या जयश्री सूर्यवंशी होत्या. सरपंच भूषण गायकवाड, ऍड.बाळकृष्ण पाटील, आत्माराम पाटील,विजय पाटील,परेश पाटील व विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पी एस पाटील यांनी करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.ऍड. बाळकृष्ण पाटील यांनी संस्थेचा झालेला विस्तार व शाळेतून शिक्षण घेऊन उच्च पदावर गेलेल्या व्यक्तींचा आढावा घेत शालेय गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या जयश्री सूर्यवंशी यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून पुढे जाण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांनीही संस्थेबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी गतवर्षी दहावीच्या वर्गात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष व उपस्थित्यांच्या हस्ते रोख बक्षीस व शिल्ड देण्यात आले.चोपडा पंचायत समितीकडून शासकीय उपक्रमानुसार मिळालेल्या 39 सायकलींचे वाटप विद्यार्थिनींना यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ए बी सूर्यवंशी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर टी सावकारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार स्वाती पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला पर्यवेक्षक डी पी पाटील, शिक्षण प्रेमी नागरिक, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या........ 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने