सनदी लेखापाल अभिजित कुरकुटे यांच्या खडतर जीवन प्रवासाचा गावात ईतिहास

 सनदी लेखापाल अभिजित  कुरकुटे यांच्या खडतर जीवन प्रवासाचा गावात ईतिहास 

अहिल्यानगर दि.१८(प्रतिनिधी विशाल कुरकुटे) ठाणे जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी गावाची आन बान आणि शान  म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व म्हटलं म्हणजे डोळ्यासमोर उभी राहणारी प्रतिमा म्हणजे सनदी लेखापाल अभिजित संतोष कुरकुटे यांची. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शैक्षणिक उंबरठा गाठतांना अनेक संकटांच्या काट्याकुट्यांवर पाय ठेवत उंची गाठून सनदी लेखापालांची खुर्ची त्यांनी प्राप्त केली.त्यामुळे कुरकुटेंचा गवगवा गावभर पसरला असून शैक्षणिक झेप घेण्यासाठी इतरांना ते हेवा वाटू लागले आहेत.

"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात"अशी म्हण असून त्याप्रमाणे अभिजित बालपणापासूनच अत्यंत हुशार व तल्लख बुद्धीचे हजर जबाबी होते. बाबा आई चे स्वप्न हे दिवा स्वप्न न राहू देता प्रत्यक्षात उतरणारे ते सुपर सुपूत्र आहेत.दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस करून अभ्यासात डोकें घालून सी.ए.परिक्षेत दैदिप्यमान यश संपादित सनदी लेखापाल म्हणून प्रशासकीय खुर्चीवर विराजमान झाले आहेत.त्यांच्या यशाबद्दल त्यांच्यावर गावकऱ्यांसह मुंबई व पुणेकरांनी शुभेच्छांचा वर्षाव  केला आहे.तसेच पत्रकार विशाल कुरकुटे यांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या असून जोरदार अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने