चोपडा विधानसभा मतदारसंघात मविआ चे घोषित उमेदवार बदलविण्यासाठी एक गट सक्रिय.. मुंबईत जोरदार बिल्डींग सुरू

 चोपडा विधानसभा मतदारसंघात मविआ चे घोषित उमेदवार बदलविण्यासाठी एक गट सक्रिय.. मुंबईत जोरदार बिल्डींग सुरू

चोपडा दि.27(प्रतिनिधी)चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून शहरातील मातब्बर नेते शरद पवार साहेबांकडे तळ ठोकून असल्याची माहिती समोर आली आहे.. तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  घोषित झालेले उमेदवार राजू तडवी यांना पुन्हा मातोश्री दरबारात नुकतेच दाखल व्हावे लागले असून  आज सकाळपासून तळ ठोकून असल्याची  खात्रीलायक माहिती हाती आली आहे.

दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चोपडा विधानसभेची जागा सोडण्यात आल्याने त्यांच्या दुसऱ्या यादीत अधिकृत उमेदवार म्हणून मोहरद येथील  राजू तडवी यांचे नाव घोषित करण्यात आले होते त्यानंतर उबाठाचा एक गट चोपड्यातील शरद पवार गटाचे सर्वेसर्वा यांच्या दरबारात दाखल झाला त्यावेळी मात्र सदरील  महोदयांनी आम्हाला आपल्या उमेदवाराचे तिकीट मान्य नसल्याचे सांगून आम्ही शरद पवार साहेबांशी बोलणी करू असे सडेतोड उत्तर दिल्याने खळबळ आली आहे त्या दृष्टीने  पवार साहेबांच्या दरबारात थेट  काही कार्यकर्ते गेल्याचे समजते.तिथे जोरदार प्रयत्नांची पराकाष्ठा पणाला लावली असल्याचे खात्रीलायक माहिती समोर आली आहे.यावरुनआघाडीचा  कप्तान बदलण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहे  तर दुसरीकडे परिस्थिती लक्षात घेता घोषित उमेदवार राजू तडवी यांनीही आज मातोश्रीवर धाव घेतली असून सकाळ पासूनच ठोकून असल्याचे काही कार्यकर्त्यांनी म्हटले  आहे.एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये चोपडा मतदार संघात प्रचंड खलबते शिजू लागली आहेत. आज दुपारपर्यंत फायनल निर्णय होण्याची शक्यता आहे.तूर्त तरी चोपडा मतदारसंघात राजकीय उलथापालथ होण्याची  शक्यता वर्तवण्यात आली आहे.लवकरच पर्दाफाश होईल तोपर्यंत नागरिकांना थोड सबुरीने घ्यावे लागणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने