चोपडा विधानसभा मतदारसंघात उबाठा पक्षाच्या पदाधिकारीं निवड जाहीर तालुकाप्रमुखपदी देवेंद्र सोनवणे तर शहरप्रमुखपदी महेंद्र भोई व शशिकांत कन्हैया यांची निवड
मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व खा.संजय राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या मातोश्रीवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.त्यात चोपडा तालुकाप्रमुख देवेंद्र विश्वासराव सोनवणे,विधानसभा क्षेत्रप्रमुख योगेश शिवाजी पाटील,शहरप्रमुख शशीकांत बाळासाहेब कन्हैया,शहरप्रमुख महेंद्र मोहन भोई,तालुका संघटकअनिल जगन्नाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना जोमाने कामाला लागा अशा सूचना देऊन नियुक्ती पत्र प्रदान केले आहे.
उपरोक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख गोपाल चौधरी, कमलेश बडगुजर, युवा सेना प्रमुख मंगेश पाटील, सुभाष शिंपी,अनिल भोई, विजू महाजन, आकाश मातंग, गणेश कन्हैया, मनोहर पाटील (गोरगावले), शंकर भोई,बल्लू पवार,बबलू भोई, भगवान भोई,कालू पारधी, प्रविण चावरे, चेतन लोहार शांताराम पारधी आदींनी अभिनंदन केले आहे