1920 कर्मचाऱ्यांनी घेतले निवडणूकीचे प्रशिक्षण .. अनुपस्थितांना कारणे दाखवा नोटीस

1920  कर्मचाऱ्यांनी घेतले निवडणूकीचे प्रशिक्षण .. अनुपस्थितांना कारणे दाखवा नोटीस बजावणार

चोपडादि.२६( प्रतिनिधी) येथील विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज करणे सुलभ व्हावे यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर सुरेश पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण दोन सत्रात पार पडले. पहिल्या सत्रात 865 केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदान अधिकारी यांच्यासाठी तर दुपारच्या दुसऱ्या सत्रात 1055 इतर मतदान अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम सत्रात 21 मतदान केंद्राध्यक्ष आणि 17 प्रथम मतदान अधिकारी गैरहजर होते तर दुसऱ्या सत्रात 54 कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. अनुपस्थित कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना प्रथम मौखिक प्रशिक्षण तर दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएम मशीन हाताळणे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थ्यांचे ज्ञान तपासण्यासाठी त्यांच्यासाठी वस्तुनिष्ठ परीक्षेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

      यावेळी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार सचिन बांबळे,योगेश पाटील, किरण मेश्राम,एस डी सैंदाणे, जोशी , तसेच प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी नरेंद्र सोनवणे, सर्व  मास्टर ट्रेनर, सर्व क्षेत्रीय अधिकारी नोडल अधिकारी आणि महसूल विभागाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने