भारत राष्ट्र समिती मार्फत आषाढी एकादशीनिमित्त मानव तीर्थमध्ये फराळ वाटप

 भारत राष्ट्र समिती मार्फत आषाढी एकादशीनिमित्त मानव तीर्थमध्ये फराळ वाटप 

चोपडा दि.१७(प्रतिनिधी)भारत राष्ट्र समितीच्या जळगाव जिल्हा कार्यकर्त्यांमार्फत  वेले येथील  वृद्धाश्रमात वृद्ध आजी बाबां व दिव्यांग व्यक्तींना आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटपाच्या कार्यक्रम संपन्न झाला.

भारत राष्ट्र समितीच्या जळगाव जिल्हा महिलाआघाडी अध्यक्ष कोमल ताई पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख समाधान बाविस्कर व महिला आघाडी तालुका अध्यक्ष अनिता जाधव यांच्या प्रयत्नातून आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर वेले येथील मानव सेवा तीर्थ या ठिकाणी निवासीत वृद्ध निराधारांना केळी आणि साबुदाणा खिचडी वाटप करुन मानवतेची ज्योत तेवत ठेवली आहे. यावेळी संस्थे मार्फत आयोजकांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने