चोपडा पीपल्स बँक व अंबाडा गृप ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण

 चोपडा पीपल्स बँक व अंबाडा गृप ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण

चोपडा,दि.१८( प्रतिनिधी )-चोपडा पीपल बँक  व अंबाडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर शंकर पाटील  यांच्याकडून ग्रुप ग्रामपंचायत अंबाडा यांना विविध वृक्षांची रोपे भेट देण्यात येऊन वृक्षारोपण करण्यात आले.                                  

  चोपडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अंबाडा च्या वतीने खरद फाटा ते खरद ,अंबाडा व नारोद गाव रस्त्यावर आणि नारोद स्मशान भूमीवर वृक्षांची लागवड करण्यात आली.  यावेळी शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन तथा खरद विकास सोसायटीचे चेअरमन सचिन भाऊ ईश्वर धनगर ,सरपंच  शुभांगी सुनील भिल , उपसरपंच सखुबाई रमण पाटील,  ग्रामसेवक मनोज वसंत चौधरी व गावकरी मोठ्या उपस्थित होते .
गावाचे सरपंचांनी  प्रत्येक ग्रामस्थाने एक तरी रोप लागवड करून जगवावे असे आवाहन केले .                         

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने