चोपडा विधानसभा मतदारसंघात सध्याचे चित्र..माघारी नंतर होईल स्पष्ट

 चोपडा विधानसभा मतदारसंघात सध्याचे चित्र..माघारी नंतर होईल स्पष्ट

चोपडा दि. 30 (प्रतिनिधी)- चोपडा विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी काल शेवटच्या   दिवसापर्यंत एकूण २३ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. बाळू साहेबराव कोळी, हिरालाल सुरेश कोळी, चंद्रकांत बळीराम सोनवणे, गौरव चंद्रकांत सोनवणे, जगदीशचंद्र रमेश वळवी, शुभम गिरीश विसावे, डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला, रुस्तम नाशिर तडवी, भूषण मधुकर भील, संभाजी मंगल सोनवणे, अमित सिराज तडवी, साहेबराव कौतिक सैंदाणे, अमिनाबी रज्जाक तडवी आदींनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले.आजच्या घडीला हे चित्र जरी दिसत असले तरी  ते येत्या दोन दिवसांत दिसणार नाही.काहींचे अर्ज छाणणीत त्रुटीं अभावी बाद होतील आणि बरेचसे उमेदवार हे माघार घेण्याची शक्यता राहते.त्यामुळे खरे चित्र हे दोन दिवसात स्पष्ट होईल तोपर्यंत नागरिकांना थोडा धीर धरावा लागणार आहे.

सुनील तुकाराम भिल यांनी भारत आदिवासी पार्टी, चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी शिवसेना, गौरव चंद्रकांत सोनवणे (शिवसेना) म्हणून तर प्रभाकर गोटू सोनवणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून, साहेबराव कौतिक सैंदाणे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) तर युवराज देवसिंग बारेला यांनी बहुजन समाज पार्टी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरले. एकूण 16 उमेदवारांनी 23 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

यामध्ये बाळू साहेबराव कोळी, सुनील तुकाराम भिल, हिरालाल सुरेश कोळी, जगदीशचंद्र रमेश वळवी, शुभम गिरीश विसावे, डॉ. बारेला चंद्रकांत जामसिंग, रुस्तम नासिर तडवी, भूषण मधुकर भिल, युवराज देवसिंग बारेला, संभाजी मंगल सोनवणे, अमित सिराज तडवी, अमिनाबी रज्जाक तडवी यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला असून माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी ४, आमदार पुत्र गौरव चंद्रकांत सोनवणे यांनी ३, प्रभाकर गोटू सोनवणे यांनी २ तर साहेबराव कौतिक सैंदाणे यांनी २ असे अर्ज दाखल केलेले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने