चोपडा विधानसभे मोहरद येथील माजी शिक्षण अधिकारी राजू तडवी यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे उमेदवारी जाहीर

 चोपडा विधानसभेसाठी मोहरद येथील माजी शिक्षण अधिकारी राजू तडवी यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे उमेदवारी जाहीर

चोपडा दि.२५(प्रतिनिधी) :चोपडा विधानसभे साठी बऱ्याच प्रतीक्षेनंतर शिवसेना उ.बा.ठा सेना (महाविकास) आघाडीतर्फे  अखेर  मुंबई येथील महानगर पालिका येथील उच्चशिक्षित शिक्षण क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी राजू अमीर तडवी (मोहरद) यांना  चोपडा विधानसभेसाठी  नुकताच एबी फॉर्म देऊन तिकीट जाहीर केले आहे.


ते मोहरद येथील लोकनियुक्त सरपंच हाजी रमजान तडवी यांचे मोठे बंधू आहेत.   राजू तडवी हे मुंबई महानगरपालिका येथे शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होते .  त्यांची भरीव कामगिरी लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी  त्यांच्यावर विश्वास दाखवून तसेच स्थानिक पातळीवरून कार्यकर्त्यांच्या मागणीवरून त्यांना तिकीट देण्यात आले आहे . तिकीट मिळाल्याबद्दल आदिवासी समाजाकडून  उद्धव बाळासाहेब ठाकरे. राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले  तसेच तालुक्यातील महाविकास आघाडी चे कार्यकर्ते यांचे त्यांनी  आभार व्यक्त केले आहेत.

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी यादी जाहीर ती पुढीलप्रमाणे 

♦️१) धुळे शहर- अनिल गोटे

♦️२) चोपडा (अज) राजू तडवी

♦️३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन

♦️४) बुलढाणा- जयश्री शेळके

♦️५) दिग्रस पवन श्यामलाल जयस्वाल

♦️६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील

♦️७) परतूर- आसाराम बोराडे

♦️८) देवळाली (अजा) योगेश घोलप

♦️९) कल्याण पश्चिम- सचिन बासरे

♦️१०) कल्याण पूर्व- धनंजय बोडारे

♦️११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव

♦️१२) शिवडी- अजय चौधरी

♦️१३) भायखळा- मनोज जामसुतकर

♦️१४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

♦️१५) कणकवली- संदेश भास्कर पारकर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने