निवडणुकी संदर्भात आरोग्य विभागाची बैठक संपन्न

 निवडणुकी संदर्भात आरोग्य विभागाची बैठक संपन्न 

चोपडा दि.२५( प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील आरोग्य विभागाची सर्व वैद्यकीय अधिकारी परिचारिका पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांची बैठक तहसील कार्यालयात पार पडली.

या बैठकीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आरोग्य विभागाच्या वतीने मतदान केंद्रांवर मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्याच्या सूचना केल्या. मतदानासाठी येणाऱ्या गरोदर महिलांना मतदानासाठी सहाय्य करण्यासाठी अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या मदतीसाठी देखील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दक्ष रहावे, मतदान केंद्रांवर ऐनवेळी एखादी वैद्यकीय गरज भासल्यास ताबडतोब सेवा उपलब्ध करून द्यावी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी प्रथम प्राधान्याने मतदानाचा हक्क बजावावा, निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करावे अशा आशयाच्या सूचना आरोग्य विभागाच्या या बैठकीत करण्यात आल्या. 

      या बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब थोरात  यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासुरकर, वैद्यकीय अधिकारी,आरोग्य पर्यवेक्षक परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने