अखेर भाकप मोर्चेकरांचे निवेदन टपाल विभागात.. संबंधित अधिकारी जागेवर नसल्याने पंचाईत

 

अखेर भाकप मोर्चेकरांचे निवेदन टपाल विभागात.. 

चोपडा दि.१८(प्रतिनिधी):भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे चोपडा तहसीलदार कार्यालय समोर कमनिष्ठ नेते कॉम्रेड अमृत महाजन यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.यावेळी दुपारपर्यंत संबंधित अधिकारी जागेवर नसल्याने मोर्चेकऱ्यांना आपले निवेदन टपाल पेटीत टाकावे लागल्याचा प्रसंग ओढवल्याने निदर्शनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विजयवाडा महाधिवेशनाने देशात जातीनिहाय जन गणना करावी म्हणून आंदोलनाची हाक दिली आहे.भारतात 2011 ची जनगणना नंतर 2021 ची जनगणना व्हावयास पाहिजे होती. परंतु मोदी सरकारने ती  केली नाही  आता ओबीसी विरुद्ध जरांगे  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे बिहार राज्यात महागठबंधन सरकारने सर्वे करून कोणती जात किती संख्येने आहे ही माहिती जाणून घेऊन त्यानुसार विकासाचा आराखडा चालवलेला आहे. महाराष्ट्रातही निहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या नावाने टपाल खात्यात जमा केले 

दुपारी 12 वाजे पावेतो तहसीलदार कार्यालयात संबंधित अधिकारी कोणीच हजर नव्हते सर्व तहसील कार्यालय कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा भरोवशावर होते.त्यामुळे निदर्शकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.यावेळी
आंदोलनात शांताराम पाटील, वासुदेव कोळी
अंबालाल राजपूत ,शोभा मंडोरे ,अलकाबाई कुंभार ,संतोष कुंभार ,आबा महाजन ,अरुण धनगर, विश्वास साळुंखे, वासनिक, सुभाष दौलत पाटील यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने