चोपडा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे ♦️ सत्रासेन ते देवझिरी पयऀत आदिवासी परिसरात ५३४ कोटी रुपयांचा बंफर निधी

 चोपडा तालुक्याच्या  सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : माजी आ. प्रा.चंद्रकांत सोनवणे 

♦️ सत्रासेन ते देवझिरी पयऀत आदिवासी परिसरात ५३४ कोटी रुपयांचा बंफर निधी 

चोपडा दि.१८(प्रतिनिधी):चोपडा विधानसभा आदिवासी बहुल असल्याने आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी वैजापूर येथे केले. यावेळी त्यांचे वरद हस्ते मुलींसाठी साडे चौदा कोटी रुपयांचे वस्तीगृहाच्या भूमिपूजन झाले .आमदार लताताई सोनवणे यांच्या माध्यमातून ५३४ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून चोपडा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

 ते पुढे म्हणाले की, सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या माझ्या आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी उत्तम सोयी उपलब्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निवासासाठी, अभ्यासासाठी, उत्तम दर्जाच्या सोयुनियुक्त वसतिगृहाची निर्मिती तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून अनेर नदीवर ठिकठिकाणी २१ कोटी रुपयांचे साठवण बंधारे, तर  दळणवळणाच्या जलद सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून २१० कोटी रुपयांचे निमगव्हाण ते वैजापुर ३३ किमी रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे तसेच २०८ कोटीचे बुधगांव ते खामखेडा फाटा २८ किमी रस्त्याचे कॉक्रिटीकरण करणे,१० कोटींचा कजाऀणे ते धवली दरम्यान अनेर नदीवर पुल बांधकाम , वैजापूर येथे १४.५० कोटीची नवीन आश्रमशाळा,तसेच २१ कोटीचा खामखेडा फाटा ते देवझिरी पयऀत रस्ता सुधारणा अशा मोठ्या कामांचा समावेश आहे. तर शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध राहील असे महत्वाकांक्षी प्रकल्प हंड्या कुंड्या धरणाच्या मंजुरीचे काम हे अंतीम टप्प्यात असल्याचे सांगितले. 

     यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात ,आर. एफ.ओ. समाधान सोनवणे, कावेरी कमलाकर मॅडम ,विकास भाऊ पाटील रावसाहेब पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिवराज पाटील ,विजय पाटील ,किरण देवराज कैलास बाविस्कर बबलू पालीवाल संजय शिरसाट, प्रताप पावरा,लालबाई प्रताप पावरा सरपंच मेलाने, वैजापूर सरपंच दप्तरसिग भाऊ,प्रल्हाद पाडवी सरपंच बोरमळी धरमसिंग बारेला सरपंच बोराअजंटी अलका  बारेला सरपंच कर्जाने दिनेश बारेला सरपंच उमर्टी,पंडित कोळी , नाना महाराज नकुल पवरा ,बबलु बारेला,लालु बारेला,अनिल पावरा, ताराचंद पाडवी,पी आर माळी सर, कुणाल पाटील गोपाल चौधरी गणेश पाटील सचिन महाजन शेटे सर लोकेश काबरा पंडित कोळी, दशरथ बाविस्कर,शाम पाटील, वाल्मीक बाविस्कर सरपंच,गोपाल देवराज, विकास बारेला,संदीप सोनवणे अरुण बाविस्कर प्रवीण बाविस्कर शिवाजी कोळी, सुरेश कोळी, नितीन कोळी, गोपाल पाटील , ज्ञानेश्वर कोळी,शिवलाल भाऊ,गुलाब कोळी, मुकेश कोळी ,मुख्याध्यापक एस आर देवराज ,देविदास पाटीआदी उपस्थित होते 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने