वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे सार्वे तलाव परीसरात वृक्षारोपण..

 

वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे सार्वे तलाव परीसरात वृक्षारोपण..

धरणगाव दि.१९(प्रतिनिधी): वर्ल्ड व्हिजन इंडिया  व ग्रुप ग्राम पंचायत जांभोरा यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जुलै 2024 रोजी सार्वे तलावाच्या आजु बाजूच्या संपुर्ण परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
           वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे व   जांभोरे गावाचे उपसरपंच किशोर सुपडू भिल यांनी संयुक्तरीत्या  एकत्रित येत परिसरात वृक्ष लागवड करून घेतली.गेल्या वर्षी या  भागात वर्ल्ड व्हिजन इंडियाने  सामाजिक दातृत्व दाखवत तलावाचे खोली करण व कुंपणाचे काम करून घेत फळाचे झाडे लावून गावाला सुंदर परिसर निर्माण करुन देऊन मोलाचा हात दिला आहे.पाणी साठवण तलावामुळे  गावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे

यावेळी प्रकल्प अधिकारी जितेंद्र गोरे यांनी झाडे का लावली पाहिजे व त्याचे इतर फायदे  गावकऱ्यांना समजवून  सांगितले.
सदर प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य अशोक केशव अहिरे,   सुरेश भगवान पवार, मंगलाबई पवार ग्रा. स. सार्वे, आर इ सी शिक्षिका दीपिका गणेश पाटील , अनिता केशव पाटील ,बचत गटाची सी. आर. पी. अनिता पाटील, दीपिका जतन पाटील, शितल जितेंद्र अहिरे, सिंदुबाई मालचे, आरती दिलीप पाटील वालेंनटियर व वर्ल्ड व्हिजन इंडिया चे कर्मचारी रतीलाल वळवी, निखील कुमार सिंग, दोन्ही बाल गटाचे अध्यक्ष व सचिव व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने