रोटरी क्लब प्रेमाचे प्रतिक : माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी

रोटरी क्लब प्रेमाचे प्रतिक : माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी 

♦️ रोटरीचा नुतन पदाधिकारी पदग्रहण समारंभात  वृत्त आवरण  व छत्रछाया प्रकल्प राबविण्याचा निर्णय 

चोपडा दि.२०(प्रतिनिधी)रोटरी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून जागतिक स्तरावर काम करणारी सेवाभावी संस्था आहे या संस्थेचे वर्ष हे 1जुलै पासून सुरू होते म्हणून सन 2024-25 चा पदग्रहण समारंभ शहरातील आनंदराज पॅलेस येथे पार पडला ह्यावेळी अध्यक्षपदी डॉक्टर ईश्वर सौंदणकर मानद सचिव पदी भालचंद्र पवार कोषाध्यक्षपदी प्रदीप पाटील सहसचिव पदी संजय बारी यांनी पदग्रहण केले व तसेच चोपडा इनरव्हील क्लबचे अध्यक्ष वैशाली सौंदणकर, मानत सचिव म्हणून पूनम गुजराती तर कोषाध्यक्षपदी कांचन टिल्लू यांनी पदग्रहण केले

याप्रसंगी अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी होते प्रमुख पाहुणे कवित्रीबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय माहेश्वरी, डिस्ट्रिक्ट 3030 चे सहप्रांतपाल अभिजीत भंडारकर, डिस्ट्रिक्ट जॉईन सेक्रेटरी नितीन अहिरराव,रुपेश पाटील (माजी अध्यक्ष), अर्पित अग्रवाल (माजी सचिव) व पवन गुजराथी (माजी कोषाध्यक्ष) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी केले व प्रस्ताविक डॉक्टर ईश्वर सौंदणकर यांनी केले यावेळी त्यांनी आपण पुढील वर्षात प्रकल्प घेणार आहोत याबाबतची माहिती सर्वांना दिली व त्यानंतर आपल्या डायरेक्टर बॉडीचे त्यांनी परिचय करून दिला याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ चोपडा कडून गरजू लोकांसाठी तीन प्रकल्प घेण्यात आले ते म्हणजे

पेपर वाटप बंधूंसाठी वृत्त आवरण प्रकल्प

जगातील घडामोडी बाबत आपल्याला घरात बसून वाचता यावे म्हणून ऊन पाऊस थंडी या काळात नेहमी तत्पर सेवा देणारे आपले वृत्त पेपर वाटप करणारे बंधूंना आपल्याकडून आपुलकीची भेट म्हणून रेनकोट वाटपाचा प्रकल्प हाती घेतला आहे म्हणजेच *वृत्त आवरण* प्रकल्प होय या प्रकल्पांतर्गत चोपडा तालुक्यात जेवढे वृत्त वाटप करणारे बंधू आहेत त्यांना रेनकोट देऊन आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो याची जाणीव रोटरी क्लब ऑफ चोपडा ने करून दिले यासाठी रोटे संदेश क्षिरसागर(प्रकल्प प्रमुख)रोटे शशिकांत पाटील (सह प्रकल्प प्रमुख) म्हणून कार्य केले

त्यासोबतच दुसरा प्रकल्प म्हणजे गटइ कामगार बंधूंना छत्री वाटप करण्यात आले नेहमी आपण रस्त्याच्या कडेला छोट्याशा जागेत आपलं जीवन जगणारा व नेहमी समाजाला उपयोगी पडणारा गटई कामगार बंधू जो उन्हात पावसात थंडीत आपले काम करत असतो हे काम करत असताना तो समाजातील लोकांना येणाऱ्या अडचणी म्हणजेच त्यांच्या पादत्राणांचे गठइ  करण्याचे काम करत असतो ज्यात त्या व्यक्तीची उन्हात पावसात संरक्षण होईल या दृष्टीने नेहमी कार्यतत्परता दाखवत असतात व त्यासाठी मिळणारा मोबदला सुद्धा कमी असतो म्हणूनच अशा वंचित व उपेक्षित घटकाला आपुलकीची भेट म्हणून त्यांच्या उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मोठी छत्री वाटपाचा प्रकल्पाचे घेतला तो म्हणजेच *छत्रछाया* होय या प्रकल्पांतर्गत आपण चोपडा तालुक्यातील गटई कामगार बंधू यांना मोठ्या छत्रीच्या माध्यमातून एक छोटेसे छत्र दिले व यासाठी रोटे संतोष बाविस्कर (प्रकल्प प्रमुख)रोटे मनोज पाटील (सह प्रकल्प प्रमुख) म्हणून कार्य केले तसेच तिसरा प्रकल्प म्हणजे एका जागेवर बसून वृत्त पेपर वाटप करणारे चोपडा तालुक्यातील बंधूंना आपण समाजाचे देणे लागतो हा मानस मनात ठेवून रोटरी क्लब ऑफ चोपडा ने वृत्त छाया ह्या प्रकल्पांतर्गत त्यांना मोठ्या छत्र्या दिल्या व त्यामुळेच त्यांचे भविष्यात पेपर वाटप करत असताना उन्ह-पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी मोठी छत्री त्यांना भेट दिली यासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून रोटे शिरीष परिवार यांनी कार्य केले

यानंतरसहप्रांतपाल माननीय अभिजीत भंडारकर यांनी प्रांतपालांच्या क्लब साठी असणारा संदेश वाचून दाखवला व पुढील वर्षासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर विजय माहेश्वरी यांनी भारताची शिक्षण व्यवस्था जगातील पहिल्या पाच क्रमांकात असून त्यात अजून मूलभूत बदल करण्यासाठी आपणास प्रयत्नशील राहायचे आहे असे प्रतिपादन केले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुण भाई गुजराथी यांनी रोटरी प्रेमाचे प्रतिक असून ज्याला मित्र नाही तो घरीच व मैत्रिणी निर्माण व्हावी यासाठी रोटरी ची स्थापना करण्यात आली असे त्यांनी सांगितले व सोबत आपल्या नेहमीच्या शैलीत आपले मनोगत व्यक्त केले व सर्व रोटरी सदस्य व उपस्थितना मार्गदर्शक केले

तसेच मानत सचिव भालचंद्र पवार यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी रोटरी, इनरव्हील रोट्ट्रॅक्ट व रोटा किड्स चे सर्व सदस्य बंधू व भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे शेवट हा राष्ट्रगीताने करण्यात आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने