प्रताप विद्यामंदिराचे सेवा निवृत्त कला शिक्षक एस.एच.पाटील यांचा 'मन मंथन' कविता संग्रहाचा उद्या प्रकाशन सोहळा

 प्रताप विद्यामंदिराचे सेवा निवृत्त कला शिक्षक एस.एच.पाटील यांचा 'मन मंथन' कविता संग्रहाचा उद्या प्रकाशन सोहळा

चोपडा दि.२०(प्रतिनिधी): येथील प्रताप विद्यामंदिराचे सेवा निवृत्त कला शिक्षक श्री.एस.एच.पाटील  यांचा 'मन मंथन'या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा दि. २१/७/२०२४ रविवार रोजी सायंकाळी ५.०० वा. प्रताप विद्या मंदिर येथे आयोजित केला आहे. 

हा प्रकाशन सोहळा प्रा. अरूणभाई गुजराथी (मा. विधानसभा अध्यक्ष, म.राज्य) यांच्या शुभहस्ते होत असून प्रा.डॉ.एल.ए.पाटील (नॅनो शास्त्रज्ञ) (मा. प्राचार्य, प्रताप महाविद्यालय, अमळनेर) हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. धर्मसिंह पाटील (से.नि. प्राध्या. तत्वज्ञान विभाग प्रमुख, प्रताप महाविद्यालय) , चंद्रहासभाई गुजराथी (चेअरमन, चोपडा पीपल्स् को.ऑप.बँक),  माधुरीताई मयूर (सचिव, चोपडे शिक्षण मंडळ, चोपडे) , कवी अशोक सोनवणे (संस्थापक अध्यक्ष, म.सा.प.शाखा. चोपडा), कवी प्रा.एस.टी.कुलकर्णी (उपाध्यक्ष, नगर वाचन मंदिर, चोपडा),  गोविंदभाई गुजराथी (कार्यवाहक, नगरवाचन मंदिर, चोपडा), कवी विलास पाटील (संस्थापक कार्याध्यक्ष, म.सा.प.शाखा. चोपडा) ,कवी रमेश जे. पाटील (ज्येष्ठ पत्रकार, आडगांव)हे उपस्थित राहणार आहेत.

तरी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अॅड. राहूल पाटील मित्र परिवाराने  एका पत्रकान्वये केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने