चोपडा तालुक्यात बालकांसाठी राबवली जात आहे अतिसार नियंत्रण मोहीम

 चोपडा तालुक्यात बालकांसाठी राबवली जात आहे अतिसार नियंत्रण मोहीम

चोपडा,दि.१२(प्रतिनिधी):जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांचे सूचनेनुसार, तथा जिल्हा साथ रोग अधिकारि-डॉ.बाळासाहेब वाभळे, डॉ.सुधा चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी-डॉ.प्रदिप लासुरकर यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यासह सबंध जिल्ह्याभरात,सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत "अतिसार नियंत्रण जनजागृती पंधरवाडा मोहीम" राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण कार्यक्रमासाठी येत्या काळात पाच वर्षाखालील लहान बालकांनमध्ये आढळणारा अतिसार आजार नेमका काय?

जाणुन घेऊ लक्षणे, उपाय:-

नुकताच पावसाळा सुरु झाला आहे. आणि पावसाळा ऋतू म्हटला की साथीचे रोग, अतिसार, डेंग्यू, मलेरिया हे आजार टाळता येत नाहीत.

 यावेळी मुख्यतः अतिसाराचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते. त्यानुसार आरोग्य विभागाकडून अतिसाराचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून १० टक्के बालके अतिसारामुळे दगवतात. अर्भक मृत्यूदर आणि बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अतिसारामुळे होणारे बाल मृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन जळगांव जिल्ह्यात ६ जुन ते २१ जुन २०२४ या कालावधीत 'अतिसार नियंत्रण पंधरवडा' राबविण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी अतिसार म्हणजे काय? अतिसाराची लक्षणे कोणती? आणि अतिसार झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

अतिसार संसर्गाची कारणे:-

अतिसार हे अनेक जिवाणू, विषाणूजन्य आणि परजीवी जीवांमुळे होणा-या संसर्गाचे लक्षण आहे, ज्यापैकी बहुतेक विष्ठा-दूषित पाण्यामुळे पसरतात. जेव्हा पुरेशी स्वच्छता आणि स्वच्छता आणि पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी आणि साफसफाईसाठी सुरक्षित पाण्याची कमतरता असते, तेव्हा संसर्ग अधिक सामान्य असतो.

उपाय व आरोग्य शिक्षण:-

डायरियावर ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस), स्वच्छ पाणी, साखर आणि मीठ यांचे द्रावण वापरून उपचार केले पाहिजेत. या व्यतिरिक्त, 10-14 दिवसांचा विखुरण्यायोग्य झिंक टॅब्लेटचा पूरक उपचार कोर्स डायरियाचा कालावधी कमी करतो आणि परिणाम सुधारतो.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आरोग्य कर्मचारी वर्ग, आशा सेविका यांच्या मार्फत ६ ते २१जुनच्या दरम्यान घरोघरी जाऊन अतिसार नियंत्रण कार्यक्रमासाठी  पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांचे सर्वेक्षण करून त्या बालकांच्या घरात ओ.आर.एस. आणि झिंक गोळ्यांचा वापरावर तसेच उपलब्धता वाढविण्यावर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे.

ओ.आर.एस आणि झिंक गोळ्यांचे वाटप

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण कार्यक्रमासाठी येत्या काळात पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरात ओ.आर.एस. आणि झिंक गोळ्यांचा वापर तसेच उपलब्धता वाढविण्यात येणार आहे. 

त्यासाठी एकूण ४ लाख २२ हजार २३१ एवढ्या ० ते ५ वर्षे बालकांना.. ओ.आर एस आणि झिंक गोळ्यांचे वाटप आशा कार्यकर्तीमार्फत करण्यात येणार आहे. आशामार्फत गृहभेट देऊन ओ.आर.एस. बनविण्याबाबत ३ हजार ९४३  प्रात्याक्षिके करून दाखविण्यात येणार आहे. प्रत्येक उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयामार्फ़त ओ.आर.टी कॉर्नर स्थापन करण्यात आले असून या ठिकाणावरून ओ.आर.एस आणि झिंक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांचे आदेशानुसार... हि अतिसार नियंत्रण मोहिमेद्वारा... अर्भक मृत्यूदर आणि बालमृत्यूदरचे प्रमाण कमी होण्यावर, मुखत्वे त्यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे.

पालकांनी कोणती काळजी घ्यावी?

१)बाळाला अतिसार झाल्यास पालकांनी विशेषत: मातांनी काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे. जसे की,

२)बाळाला जेवण भरवण्यापूर्वी नीट स्वच्छतेची काळजी घ्यावी. 

३)बालकाला अतिसार झाल्याबरोबर (एका दिवसात तीनपेक्षा जास्त वेळा जुलाब होणे) लगेच ओ.आर.एसचे द्रावण द्यावे.

४)अतिसार थांबेपर्यंत द्रावण देत राहावे.

५)पहिल्या अतिसारानंतर बालकाला १४ दिवसांपर्यंत झिंकची गोळी द्यावी.

६)अतिसार होणे थांबले तरी झिंक गोळी देत राहावी.

७)बाळाला स्वच्छ हातानी स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी पाजावे.

८)बाळाच्या विष्ठेची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी.

या दरम्यान जे बाळ स्तनपान करीत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवावे. अतिसार दरम्यान आणि नंतरही जास्तीत जास्त स्तनपान द्यावे. बालक अधिक आजारी असेल, स्तनपान करू शकत नसेल, शौचातून रक्त पडत असेल, पाणी कमी पीत असेल किंवा ताप येत असेल, यापैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या आरोग्यसंस्थेशी, गावातील आशा कार्यकर्ती किंवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने