गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसांसह एकास पकडले.. ग्रामीण पोलिसांची कामगिरी

 

गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसांसह एकास पकडले.. ग्रामीण पोलिसांची कामगिरी

चोपडा,दि.१२(प्रतिनिधी) तालुक्यात ग्रामीण पोलिसांनी वैजापूर हद्दीत तीन गावठी बनावटीचे पिस्टल, दहा जिवंत काडतुससह आरोपीस  हतकडीत अडकविल्याची जोरदार कामगिरी केली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी,
चोपडा तालुक्यातील वैजापूर गावचे हद्दीत खा-यापाडा ते वैजापूर रोडवर दि ११/०६/२०२४ रोजी १६.४५ वा चे सुमारास ३०,०००/- कि चा एक गावठी कट्टा (पिस्टल) लोखंडी स्टील धातुचा त्याला काळ्या रंगाची मुठ व त्यावर लाल रंगाचे स्टारचे चिन्ह असलेल्या मॅक्झिनसह कि.अ.३०,०००/- कि चा एक गावठी कट्टा (पिस्टल) लोखंडी स्टील धातुचा त्याला काळ्या रंगाची मुठ त्यावर काळे रंगाचे स्टारचे चिन्ह असलेल्या मॅक्झिनसह कि.अ.३०,०००/- कि चा एक गावठी कट्टा (पिस्टल) लोखंडी स्टील धातुचा त्याला काळ्या रंगाची मुठ त्यावर काळे रंगाचे स्टारचे चिन्ह असलेला मॅक्झिनसह कि. अ.१००००/- रु किमतीचे पिवळया धातुचे १० काडतुस (राउंड) प्रत्येकी काडतुसची किंमत १०००/- रु कि अं असे एकुण १०००००/- रु दि ११/०६/२०२४ रोजी १८.३४ वा  राजपालसिग प्रधानसिंग - जुनेजा, वय ३० वर्षे रा पारउमर्टी ता वरला.जि बडवाणी,(म.प्र) हा त्याचे जवळ ०३ देशी कट्टे अग्नीशस्त्र (पिस्टल), १० जिवंत काडतुस, हे प्राणघातक अग्नीशस्त्र असल्याचे माहित असतांना सुध्दा विनापरवाना गैर कायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने आपले जवळ असलेल्या स्वताचे फायदयाकरीता बाळगून होता तर पो हे कॉ मनोज अशोक दुसाणे पोलीस मुख्यालय जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंमलदार पो हे काँ पल्लवी सुभाष वाणी चोपडा ग्रामीण पोलीस यांनी सी सी टी एन एस गुन्हा रजि नं ९५/२०२४ भारतीय हत्या कायदा कलम ३/२५, ७/२५ सह मु पो कायदा कलम ३७ (१) (३) चे १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोनि कावेरी कमलाकर,चोपडा ग्रामीण पो स्टे यांनी घटनास्थळी भेट दिली तर पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर हे  करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने