चोपडा फार्मसी कॉलेजमध्ये "Industry Awareness " कार्यशाळा संपन्न

 चोपडा फार्मसी कॉलेजमध्ये  "Industry Awareness " कार्यशाळा संपन्न


चोपडा दि.५(प्रतिनिधी)महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शरद चंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात *ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल* मार्फत Industry Awareness या विषयावर कार्यशाळा दि. 05 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाली.
Opex Accelerator Pvt. Ltd चे दिग्दर्शक आणि सह-संस्थापक श्री. सचिन कुंभोजे यांनी चतुर्थ वर्ष बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात उपयुक्त असणारी माहिती व तसेच करिअर मार्ग व जॉब डोमेन आणि कौशल्य विकासावरील अभिमुखतेबद्दल अंतर्दृष्टी यासोबत भारतीय फार्मास्युटिकल विहंगावलोकन आणि भारतीय फार्मास्युटिकल कंपनी ची कार्यप्रणाली यासारख्या विविध उपयुक्त विषयांवर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत एकूण 120 चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ही कार्यशाळा भवितव्यात अतिशय उपयुक्त ठरेल असे निदर्शनास आले. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते सचिन कुंभोजे यांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत वैयक्तिक हितगुज करून त्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी कॉलेजमध्ये प्राधान्य दिले जाते असे प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक डॉ. प्रेरणा जाधव, प्राध्यापक डॉ. रूपाली पाटील व प्राध्यापक श्रेया जैन यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष आशा पाटील, सचिव डॉक्टर स्मिता संदीप पाटील, प्राचार्य गौतम वडनेरे,  रजिस्टार श्री  प्रफुल मोरे व सर्व विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने