कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवती अभियानाला आजपासून सुरुवात

 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवती अभियानाला आजपासून सुरुवात


मुक्ताईनगर दि.५ (प्रतिनिधी सतीश गायकवाड )कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभागआणि सद्गुरु शिक्षण शास्त्र  महाविद्यालय जळगाव विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान सहा दिवसीय कार्यशाळा दिनांक 05 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. आज कार्यशाळा च्या पहिल्या दिवशी दिनांक 05/02/2024 आत्मनिर्भर युवती अभियान चे उद्घाटन पीपल्स बँक गणेश कॉलनी शाखा  व्यवस्थापक   रणजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयातील प्रभारी प्राचार्य डॉ अनिता वानखेडे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स बँक चे कर्मचारी  सीमा शिंदे आणि  विशाखा रोटे होत्या.  सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. प्रतिभा पाटील विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले. सीमा शिंदे आणि  विशाखा रोटे यांनी online banking Awareness ya विषयावर विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.यात मोबाईल बँकिंग व्यवहारातील  धोके,बँकिंग सुविधा, सायबॅर क्राईम बद्दल सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ प्रतिभा पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ जयश्री पाटील यांनी मानले. सदर कार्यशाळेत महाविद्यालयातील 50 विद्यार्थिनी उपस्थित होत्या.अभियानासाठी महाविद्यालयातील डॉ अनिता वानखेडे ,डॉ प्रतिभा पाटील, डॉ जयश्री पाटील, प्रा सुवर्णा अहिरे   व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने