नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षक शिक्षण या विषयावरील चर्चासत्र संपन्न

 नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षक शिक्षण या विषयावरील चर्चासत्र संपन्न


 मुक्ताईनगर दि.६(प्रतिनिधी) सद् गुरू   शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव येथे  दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षक शिक्षक या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित केले होते .कार्यक्रमाच्या चर्चासत्रात प्रमुख व्याख्याते म्हणून मा .हितेश गोपाल ब्रिजवासी उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात ही  सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिता वानखेडे होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुवर्णा अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षिका तेजस्विनी पाटील यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर जयश्री पाटील यांनी केला त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत डॉक्टर अनिता वानखेडे यांनी केले . नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि शिक्षक शिक्षण यांवर चर्चा करताना ब्रिजवासी सरांनी एन ए पी 2020 यामधील जे धोरणात्मक बदल झालेले आहेत तसेच ऐतिहासिक प्रवास सांगितला .तसेच एनईपी 2020 नुसार आवश्यक काय बदल झाले याबद्दलही सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षण घेण्याची रचना आणि ते मातृभाषेतून कसे असले पाहिजे तसेच बास्केट ' अकॅडमिक बँक क्रेडीट्स 'मल्टिपल एन्ट्री अँड एक्झिट यासारख्या नवीन संकल्पना समजावून सांगितले.अध्यक्ष प्रभारी प्राचार्य यांनी आपण कौशल्यपूर्ण शिक्षण हे कसे घेतले पाहिजे आणि आपण प्रत्येक कार्यक्रमात कशा पद्धतीने सहभागी व्हायला पाहिजे त्यानंतर आपल्यासमोर असणारी पिढी ही आपल्या ज्ञानाची परीक्षा घेणारी आहे आणि त्यासाठी आपण कसे सक्षम व्हायला पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी प्राचार्य डॉ.अनिता वानखेडे , डॉ . प्रतिभा पाटील ,डॉ.अनिता जावे ,डॉ .जयश्री पाटील ,प्रा . सुवर्णा अहिरे ,प्रा .जयश्री शिंगाडे , प्रा.निधी शर्मा , प्रा . बासरा पावरा तसेच पंकज वाघ ,अरविंद पवार , चंद्रकांत सपकाळे यांचे सहकार्य लाभले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने