आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या समस्यांच्या बाबतीत सोमवारी जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थितीत होणार खुलासा

 आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या समस्यांच्या बाबतीत सोमवारी जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थितीत होणार खुलासा

जळगावदि.१३(प्रतिनिधी )- ऑक्टोबर महिन्यात तब्बल 26 दिवस उपोषण करून मा.मुख्यमंत्री यांनी टोकरे कोळी जमातीला सुलभरीत्या कागदपत्रे पाहून जातीचे दाखले निर्गमित करण्याचे आदेश दिले असून सुद्धा त्या आदेशाचे प्रशासनाकडून पालन न झाल्यामुळे दोन जमात बांधवांच्या वतीने शिवतीर्थ मैदान जळगाव येथे प्रशासनाविरोधात आमरण अन्नत्याग सत्याग्रह पुकारले आहे. सदर सुरु असलेल्या आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या आमरण अन्नत्याग सत्याग्रहाला अनुसरून मा.जिल्हाधिकारी जळगाव यांनी जमातीच्या अभ्यासकांसह सोमवारी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता मोठ्या संख्येने जळगाव जिल्ह्यातील बांधवानी  सोमवारी उपस्थित राहण्याचे उपोषण स्थळावरून आव्हान करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने