शहर भाजप कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात साजरी
चोपडा दि.२५(प्रतिनिधी): तालुका भारतीय जनता पार्टी माध्यमातून शहरातील भाजप कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात साजरी.
आज दि २५ सप्टेंबर २०२२ रोजी भारत देशाचे जननायक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुका भारतीय जनता माध्यमातून चोपडा शहरातील भाजप कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमा पुजन व माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली तसेच सामुहिक मन की बात बुथ बैठक के साथ व सोबत पंडीत दिनदयाल उपाध्याय यांची बायोग्राफी प्रदर्शित करून बघण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील,विधानसभा श्रेत्र प्रमुख प्रदीप पाटील,व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मराठे,बेटी बचाओ बेटी पढाओ चे जिल्हा सदस्य लक्ष्मण पाटील,वैद्यकीय आघाडी तालुका अध्यक्ष डाॅ सुधिर पाटील,राजेंद्र बाळासाहेब सोनवणे,अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष प्रेम घोगरे,सरचिटणीस मनोहर बडगुजर,व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,जैन प्रकोष्ट तालुका अध्यक्ष संजय जैनओबीसी मोर्चा शहर उपाध्यक्ष मंगल बा,भाजपा शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील,किसान मोर्चा शहर अध्यक्ष भुषण महाजन,युवा मोर्चा शहर सरचिटणीस आकाश नेवे,शहर कोषाध्यक्ष धिरज सुराणा,सहकार आघाडी शहर अध्यक्ष कैलास पाटील,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस अमित तडवीशक्तिकेंद्र प्रमुख दिनेश जाधव,अनुसूचित जाती शहर उपाध्यक्ष प्रभुदास,सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील,या सह भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
