आदिवासी विभागातील रस्ता कामांसह विविध बांधकामे मंजूर करण्याचे सौ लताताई चंद्रकांत सोनवणे ह्यांनाआदिवासी विकासमंत्री डॉ.श्री. विजयकुमारजी गावित यांचे आश्वासन
चोपडा दि.२५(प्रतिनिधी): प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अधिनस्त शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह,जळगांव जि.जळगांव च्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, योग व क्रीडा प्रशिक्षण समारोप कार्यक्रम प्रसंगी आलेले असतांना आदिवासी विकास मंत्री डॉ.श्री. विजयकुमारजी गावित यांची भेट घेऊन आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे हयांनी विविध रस्ता कामांसह विविध मागण्यांचे निवेदन दिले असता त्यातील विविध कामांची पूर्तता करण्याचे आश्वासन आदिवासी मंत्र्यांनी दिले आहे.
त्या निवेदनात करण्यात आलेल्या कामांची यादी अशी,
- १) कर्जाने ते धावली ग्रामीण मार्ग क्र.८६ मध्ये अनेर नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी निधी मिळावा.
 - २) पुरवणी अर्थसंकल्पात आदिवासी उपाययोजने अंतर्गत आदिवासी भागातील :
 - अ) विष्णापुर ते बोरमळी रस्ता बांधकाम करणे.
 - आ) खामखेडा फाटा, उमर्टी, वैजापूर, देवझिरी रस्त्यांची सुधारणा करणे.
 - इ) मेलाणे ते बोरमळी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
 - ई) मेलाणे ते जराईतपाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
 - ए) सत्रासेन ते उमर्टी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
 - ऐ) गौऱ्यापाडाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.
 
इत्यादी रस्त्यांची कामे समाविष्ट करून त्यांस पुरेसे अनुदान उपलब्ध करून द्यावे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत :
- अ)मौजे वैजापूर येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलाला संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे.
 - आ) मौजे देवझिरी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलाला संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे.
 - इ) मौजे वाघझिरा येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलाला संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे.
 - ई) देवझिरी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलामध्ये मुलांचे वसतिगृह इमारत व नमुना नकाशा क्र.१ प्रमाणे कर्मचारी निवासस्थानांचे बांधकाम करणे.
 - ए) देवझिरी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलामध्ये मुलींचे वसतिगृह इमारत व बहुद्देशीय हॉलचे बांधकाम करणे.
 - ऐ) वैजापूर येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलामध्ये मुलींचे वसतिगृह बांधकाम करणे.
 - ओ) वाघझिरा येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलामध्ये मुलांचे वसतिगृह बांधकाम करणे.
 - औ) वाघझिरा येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलामध्ये मुलींचे वसतिगृह बांधकाम करणे.
 - अं) वाघझिरा येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा संकुलामध्ये कर्मचारी निवासस्थानांचे नमुना नकाशा १ व २ प्रमाणे बांधकाम करणे.
 
इत्यादी कामांचा समावेश करावा तसेच त्यास पुरेसे अनुदान उपलब्ध करून प्रशासकीय मान्यता द्यावी.प्रसंगी या सर्व मागण्यांवर मंत्री महोदयांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आमदार सौ.लताताई सोनवणे यांना दिले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, प्र.कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, अधीक्षक अभियंता व्ही.ए.पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, विद्यार्थी, शिक्षक तसेच पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.
