संभाजी ब्रिगेडच्या उत्तर महाराष्ट्र विभागीयध्यक्षपदी अमळनेरचे श्याम पाटील यांची निवड.. जिल्हाध्यक्षपदी तुषार सावंत तर महानगराध्यक्षपदी संदीप पाटील
अमळनेर,दि.०२ (प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हाध्यक्ष श्याम जयवंतराव पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विभागीयध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच तुषार भगवान सावंत यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी व संदीप पितांबर पाटील यांची जळगाव शहर महानगरध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
संभाजी ब्रिगेड राज्यकार्यकारणीची बैठक शिवाजी नगर, पुणे येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत प्रदेशध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हाध्यक्ष श्याम जयवंतराव पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विभागीयध्यक्ष या पदी निवड करण्यात आली तसेच तुषार भगवान सावंत यांची संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हाध्यक्ष पदी व संदीप पितांबर पाटील यांची जळगाव शहर महानगरध्यक्ष पदी निवड करण्यात आली या वेळी कार्याध्यक्ष सुधीर भोसले, कोषाध्यक्ष अमोल काटे, महासचिव सुभाष बोरकर, उपाध्यक्ष छगन शेरे व सोमेश्वर आहेर, सचिव आत्माराम शिंदे, संघटक प्रदीप कणसे पुणे जिल्हाध्यक्ष अजयसिंह खास पुणे महानगरध्यक्ष हर्षवर्धन मगदूम हे उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करतांना जास्तीत जास्त मराठा बहुजन समाजाच्या तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळून देश विदेशात जाऊन आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन करत येणाऱ्या काळात ऑस्ट्रेलिया कॅनडा” या संकल्पेच्या माध्यमातून २० लाख तरुणांना विदेशात स्थैर्य मिळवून देण्याचा माणस प्रदेशध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी बोलून दाखवला.
