*"बी फार्मसी महाविद्यालय चोपडा येथील 'म्यूझियम' चा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न"*
चोपडा दि.०२(प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ़ फार्मसी चोपडा जि. जळगाव येथे महाविद्यालयातील म्यूझियमचे दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी माननीय सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदिप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयातील या म्यूझियम मध्ये जवळपास 1200 पेक्षा जास्त फोटो फ़ोमशीट वर प्रिंट करून Photo Gallery तयार करण्यात आली आहे. महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित बी. फ़ार्मसी महाविद्यालयाची सन 1992 मध्ये स्थापना करण्यात आली आणि आज 30 वर्ष पुर्ण होत आहेत. या 30 वर्षाच्या कालावधी मध्ये विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयाने राबविलेले विविध कार्यक्रमांचे तसेच मान्यवरांच्या भेटींचे असे विविध फोटो या म्यूझियम मध्ये उपलब्ध आहेत,जे महाविद्यालयाने आजतागायत केलेल्या प्रगतीची ग्वाही देत आहेत. उद्घाटनप्रसंगी माननीय सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक केले की या म्यूझियमच्या दालनात उभे राहिले असता महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख डोळ्यासमोर उभा राहतो. तसेच या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन
व प्रेरणा मिळेल. प्राचार्य डॉ. गौतम पी वडनेरे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली म्यूझियम यशस्वीरित्या तयार करण्याकरिता समिती सदस्या प्रा.सौ.सुवर्णलता महाजन व प्रा. सौ. प्रियंका जैन यांनी परिश्रम घेतले. सदरहू कार्यक्रमास महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष सौ. आशाताई पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदिप पाटील, प्रा.भाऊसाहेब डि.बी. देशमुख, श्री.दिलीपराव साळुंखे व प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले. उद्घाटन सोहळ्यास महाविद्यालयाचेे विभागप्रमुख डॉ. के.डी. पाटिल, डॉ.बी. व्ही.जैन, डॉ. एस. आर. पवार, डॉ. एम. डी.रागीब तसेच शैक्षणिक विभागप्रमुख प्रा. सौ. के. डी. पाटिल व प्रा. टी. पी. पाटिल आदी उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचेे प्रबंधक,विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांचे सहकार्य लाभले.
