राष्ट्रपुरुषांच्या त्यागाने घडलेला भारत - प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी

राष्ट्रपुरुषांच्या त्यागाने घडलेला भारत  - प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी

 


चोपडा दि.०२(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील  *इंग्लिश भाषा अभ्यास मंडळ व भाषा मंडळ* यांच्या संयुक्त विद्यमाने 'लोकमान्य टिळक पुण्यतिथी' व 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती' निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी. ए. सुर्यवंशी, कनिष्ठ  महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.बी एस.हळपे, पर्यवेक्षक श्री.एस.पी पाटील, समन्वयक श्री.ए.एन.बोरसे यांच्या हस्ते 'लोकमान्य टिळक' व 'लोकशाहीर आण्णाभाऊ साठे' यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी मंचावर श्री. एस टी.शिंदे ,श्री.संदीप पाटील, श्रीमती अनिता लांडगे. उपस्थित होते.

   या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.डी.ए सुर्यवंशी म्हणाले की, ' आजचा भारत हा थोर महापुरुषांच्या त्यागाने सुजलाम सुफलाम झाला आहे. थोर पुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरा करण्याचा उद्देश हा वैचारिक असायला हवा, तात्पुरता नसावा प्रत्येकाने आपल्या आयुष्यात महापुरुषांचे गुण आत्मसात करून समाज परिवर्तनासाठी आपले योगदान द्यावे. राष्ट्रपुरुषांचा इतिहास हा वाचनाद्वारे समजून घेणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्याना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विविध कादंबऱ्यांची व कथांची नावे सांगून  सदर साहित्य ग्रंथालयात जाऊन वाचण्याचे व त्यातील ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.

               या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन 12 वी कला ची विद्यार्थीनी कु.मानसी निकम व श्री. विवेकानंद शिंदे तर आभार श्री. संदीप देवरे यांनी  केले. 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ सुनंदा नन्नवरे श्री. दिपक करणकाळ,श्री.निवृत्ती पाटील, श्री. सौरभ जैन.श्री.शिरीष ठाकरे,कु.साक्षी गुजराथी,श्री. राकेश काविरे व राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने