*चोपड्याचे २ तर अमळनेरच्या एका कृषी दुकानाचा परवाना रद्द..ज्यादा भावाने खत विक्री विक्रेत्यांना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचा दणका*
*चोपडा दि.०१(प्रतिनिधी )* जादा दराने खत विक्री करतांना आढळून आलेल्या चोपडा तालुक्यातील दोन तर अंमळनेर येथील एक अशा तीन कृषी दुकान संचालकांच्या दुकानाचा परवाना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तळकाफळकी रद्द केला आहे.या निर्णयामुळे शेतकरी वर्गाने जोरदार स्वागत केले असून चढ्या भावाने खंत व बि बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे .
खरीप हंगामासाठी पेरणीची लगबग सुरू असून खरीप हंगामात खत व बियाणे विक्रेतुन मोठयाप्रमाणात शेतकरी बांधवांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. विक्रेत्यांकडून शेतकरी बांधवा मोठयाप्रमाणात नुकसान देखील सहन करावे लागत असते. दरम्यान कृषि विभागाने फसवणुकीचे प्रकार घडू नये म्हणून विशेष लक्ष ठेवले असून, शेतकरी बांधवांची फसवणूक केल्यास कृषि केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचा इशारा कृषि विभागाकडून देण्यात आलेला होता.त्यानुषंगाने
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांकडून कृषि विक्री केंद्रांची तपासण्या सुरू असून श्री. अरुण तायडे (गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक )यांनी चोपड़ा व अमळनेर तालुक्यातील कृषि केंद्रांची तपासणी केली असता कृषि केंद्र चालक जादा दराने खत विक्री करतांना आढळून आल्यामुळे मे. राजप्रभा फर्टिलायझर, चोपडा, मे. अग्रवाल एनसी चोपड़ा मे. शाह एजेंसी, अमळनेर या विक्रेत्यांची परवाना व अधिकारी तथा जिल्ला अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिनांक २४.०६.२०२२ रोजी सुनावणी घेऊन खत विक्रेत्यांच्या परवान्यावर कडक कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केलेले आहेत.
खरीप हंगाम २०२२ मध्ये शेतकरी बांधवांना जादा दराने विक्री किंवा इतर अनावश्यक खतांची किग करीत असल्याचे आढळून आल्यास या कार्यालयाचा मोबाईल क्र. ०८४६८९०९६४९. ०२५७-२२३९०५४ वर माहिती द्यावी. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.