जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या शुभहस्ते दिव्यांग अक्षय महाजन यांना विवाह प्रोत्साहन ५० हजारांचे अनुदान प्रदान
जळगाव दि.१९(प्रतिनिधी):सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे विवाह प्रोत्साहन म्हणून ५० हजारांचे अनुदान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या शुभहस्ते धरणगावचे अक्षय महाजन यांना नुकतेच देण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत , जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आसिया , जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग या मान्यवरांचे उपस्थितीत वै.सा.का अधिकारी बी एन चौधरी यांच्या हस्ते दिव्यांग सेना जळगाव जिल्हाध्यक्ष श्री अक्षय महाजन ह्यांना दिव्यांग समवेत अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन अनुदान योजने अंतर्गत श्री अक्षय महाजन यांना जिल्हा समाज कल्याण विभाग मार्फत ₹ 50,000/- चे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले. सन्मानपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.