एस.पी ग्रुप पावसाळी क्रीडा स्पर्धा गोरेगाव येथे संपन्न..डोमीनेटर ठरला विजयी संघ तर हरिकेन उपविजयी संघ
मुंबई उपनगर दि.१९ (शांताराम गुडेकर ) :सालाबाद प्रमाणे यंदाही एस.पी ग्रुप तर्फे पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन गोरेगाव येथे करण्यात आले होते.महिला खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळावी म्हणून पुरुष संघासोबत एकत्र ६ संघामध्ये विभागून साखळी पद्धतीने स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात खेळविण्यात आली.प्रत्येक सामने रोमहर्षक होत गेले त्यात अंतिम सामन्यात दिक्षा शाह यांच्या डोमीनेटर संघाने हर्षा भोज यांच्या हरिकेन्स संघावर चूरशीच्या लढतीत विजय मिळवत मानाचा चषक पटकवला.मालिकविराचा पुरस्कार अनुक्रमे निधी घरात, साहिल तार्लेकर, सर्वोत्तम फलंदाज चिना रावल,रोनित राजन , सर्वोत्तम गोलंदाज हर्षा भोज,दीपेश आंग्रे तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक सुनीता सिंग, मीत पटेल ठरले
या स्पर्धेच्या निमित्ताने उटी येथे झालेल्या महिलांच्या स्पर्धेचे विजेतेपद मुंबई संघांने पटकवल्याबद्दल चिना रावल व सहकारी क्षितिजा, प्राजक्ता, रुही,जागृती यांचा तर स्पर्धेच्या आयोजनात सढळ हस्ते मदत करणाऱ्या सौ. मयुरा अमरकांत यांचा विशेष सन्मान करण्यात आला
या स्पर्धा यशस्वी ठरण्यासाठी अध्यक्ष श्री.समीर मांजरेकर,तृप्ती व्यास,मेघश्याम होदावडेकर,मयुरा अमरकांत,सनी सावला,श्वेता राठोड,संदेश पाटील,माया धुरी , गणेश त्रिलोटकर,योगिता सावंत,समीर गावडे,अक्षदा पर्वते यांनी सहकार्य केले.स्कोरर म्हणून आदेश यांनी काम पहिले.तर पंच म्हणून शोएब खान,विलास सोनवणे,निल आंग्रे यांनी सहकार्य केले.