कलियुगातील सती सावित्री ने दिले आपल्या पतीला जीवदान,,




कलियुगातील सती सावित्री ने दिले आपल्या पतीला जीवदान

*पाचोरा दि.२०( प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार)

कजगाव ता भडगाव सतीने आपल्या पतीला वाचवण्यासाठी मुत्युची देवता यमदेवतेला ही आपला डाव बदलण्यास भाग पाडले होते.अशी आख्यायिका सांगितली जाते "स्त्री" ही जगतजननी संबोधली जाते स्त्रीने ठरवले तर ती कोणत्याच कामात माघे नाही जर आपल्या परिवारा वर काही संकट ओढणारे असेल तर हीच स्त्री आपला जीव ही पणा ला लावू शकते असेच काही से घडले आहे कजगाव जि. प. शाळेमधील शिक्षक कोमलसिंग धर्मा पाटील हे किडनी च्या दुर्धर बिमारी ने त्रस्त होते. डॉक्टरांनी त्यांना किडनी ट्रान्स्फर करण्याचा सल्ला दिला परंतु किडनी देणार कोण? हा सवाल पुढे आला सर्व स्थानी अथक प्रयत्न केला परंतु किडनी दान करण्याकरिता अनेकांनी असमर्थता दाखवली त्यामध्ये किडनी ट्रान्सफर करणे फार अवघड व किचकट प्रक्रिया मानली जाते मात्र अश्यातच पत्नी पुढें येते आणि आपल्या पतीला वाचवण्यात यशस्वी ही झाली आणि खरी "रणरागिणी" ठरली 

ही सिनेमाची कहाणी वाटावी अशीच आहे शिक्षक कोमलसिंग पाटील व ऐश्वर्या कोमलसिंग पाटील हे दाम्पत्य कजगाव जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत मात्र गेल्या दोन वर्षांपासून ऐश्वर्या यांचे पती कोमलसिंग पाटील यांना किडनी संदर्भात अडचण आली व त्यांना औरंगाबाद येथील खाजगी डॉक्टरांनी किडनी बदलण्यास सल्ला दिला आणि पतीला वाचवण्यासाठी पत्नीने कुठलाच विचार न करता त्वरित होकार दर्शवून  पतीला जीवनदान देऊन कलियुगामधील खरीखुरी सावित्री ठरली आहे त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ऐश्वर्या यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे औरंगाबाद येथील डॉ सचिन सोनी यांनी ही कठीण व किचकट ऑपरेशन ची प्रक्रिया पार पाडली आहे.

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसापासून पती कोमलसिंग यांना किडनी संदर्भात अडचण आली व डॉक्टरांनी किडनी बदलण्याचा सल्ला दिला आणि कुठलाच विचार न करता मी माझी एक किडनी देण्याचा निर्णय घेतला आपल्या पतीवर येणारे प्रत्येक संकटात आता पर्यंत सोबत आहे आणि यापुढेही सोबत असणार अशी प्रतिक्रिया ऐश्वर्या पाटील यांनी CNI महाराष्ट्र शी बोलतांना दिली

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने