नाभिक समाज संस्थेच्या वतीने समाज पदाधिकाऱ्यांचा सत्कार

नाभिक समाज संस्थेच्या वतीने  समाज पदाधिकाऱ्यांचा सत्कार   


     
   
                   

 त-हाडी,ता.शिरपूर दि.१९( प्रतिनिधी. ज्ञानेश्वर सैंदाणे )                         ```मोगलाई परिसर नाभिक समाज संस्थेच्या वतीने दिनांक १८/७/२०२२ वार सोमवार रोजी नाभिक समाज भवन सत्य साईबाबा सोसायटी साक्री रोड येथे नाभिक समाजाच्या विविध मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महामंडळ धुळे जिल्हा अध्यक्ष पदी  श्री  भरत शिरसाठ, धुळे शहर नाभिक दुकानदार संघटनेचे उप अध्यक्ष पदी श्री  संजयजी अहिरराव, सलून पार्लर असोशियेशान प्रदेश अध्यक्ष पदी भोला  सैंदाणे या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करताना धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री युवराज वारुळे,  श्री राजेंद्र सोनवणे, दुकानदार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजेश  महाले, व मोगलाई परीसरातील सर्व समाज बधवांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.``

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने