बस अपघातात मृत्यू झालेल्या अमळनेरच्या चालक वाहकाच्या कुटूंबियांना आगारातर्फे तात्पुरते सानुग्रह अनुदान प्रदान.. महामंडळाचे नियमाप्रमाणे सर्वोतोपरी मदत देणार.. आगारप्रमुख श्रीमती ए.जी.भदाणे*

 *बस अपघातात मृत्यू झालेल्या अमळनेरच्या चालक वाहकाच्या कुटूंबियांना आगारातर्फे तात्पुरते सानुग्रह अनुदान प्रदान.. महामंडळाचे नियमाप्रमाणे  सर्वोतोपरी मदत देणार.. आगारप्रमुख श्रीमती ए.जी.भदाणे* 


चोपडा दि.१८( प्रतिनिधी ):मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे झालेल्या दुर्घटनेतील अमळनेर आगारातील मयत चालक व वाहक यांच्या  नातलगांकडे शासकीय स्तरावर अंतिम संस्कारासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अमळनेर आगाराच्या वतीने देण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख श्रीमती ए.जी.भदाणे यांनी दिली आहे. 

श्रीमती भदाणे यांनी घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करीत शासकीय नियमावली अन्वये मयत चालक चंद्रकांत एकनाथ पाटील व वाहक प्रकाश लक्ष्मण चौधरी यांच्या कुटुंबीयांना एस.टी.महामंडळाच्या शासकीय नियमावली प्रमाणे शक्य तेवढी भरीव मदत देण्यात येईल अनुकंपाच्या आधारित लाभ देण्याचा  प्रयत्न आमचा असल्याचेही स्पष्ट केले.

वाहक  प्रकाश चौधरी यांनी सन २००६पासून तर चालक चंद्रकांत एकनाथ पाटील यांनी २०११पासून उत्कृष्ट सेवा बजावून आगारातील कर्मचाऱ्यांचे मनात आपुलकीचे घर विणलेले आहे त्यामुळे अंमळनेर आगारात तीव्र दुःखाची छाया पसरली  असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवाशांनी भरलेली  आमची बस नर्मदा नदीत कोसळून  अपघात होऊन 13 जणांचा मृत्यू झाल्याची वार्ता कानी पडताच पायाखालची जमीन सरकली आख्खा विभाग सुन्न होऊन हताश झाल्याचेही चित्र दिवसभर होते असं त्यांनी सांगितलं.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने