*प्रताप विद्या मंदिरात पालक सभा संपन्न
चोपडा दि.२३ (प्रतिनिधी )चोपडा येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात इ 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी पालक शिक्षक सभा नुकतीच संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी होते. तसेच पर्यवेक्षक पी डी पाटील , माधुरी पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी म्हणून आडगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक कैलास मगरे उपस्थित होते.
आपल्या शाळेतील विद्यार्थी कॉपीमुक्त वातावरणातून परीक्षा देऊन सुध्दा तालुक्यात प्रथम येतात हे सर्व शक्य झाले ते पालकांच्या सहकर्यातून व शिक्षकांच्या मेहनतीतून आणि संस्था चालकांच्या मार्गदर्शनाने. शाळा विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव करून घेते. उन्हाळी वर्ग असेल, लर्निंग लॉस च्या माध्यमातून तसेच दत्तक विद्यार्थी योजनेच्या माध्यमातून व गुणवंत विद्यार्थी योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शाळेत साधला जातो. पालकांनी विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचे नाते ठेवले पाहिजे, विद्यार्थ्यांशी शाळेच्या बाबतीत हितगुज केली पाहिजे. प्रताप विद्या मंदिर समाजातील प्रत्येक घटकाला प्रवेश देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधने हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहे असे प्रतिपादन प्रशालेचे पर्यवेक्षक पी डी पाटील यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत गुजराथी यांनी पालकांनी विद्यार्थ्यांवर आपल्या विचारांचे ओझे देऊ नये. आपले मत त्यांच्यावर लादू नये अन्यथा नको असलेल्या गोष्टीकडे विद्यार्थी वळतो. विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवावे म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शिक्षकांसमवेत आपणही लक्ष द्यावे असे सांगितले.
सदर कार्यक्रमाला पालक माता पिता आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक ए जी कुलकर्णी यांनी केले तर एस एस नेवे यांनी आभार मानले.