माजी विद्यार्थिनी कु.वैष्णवी मनीष काबरा हिचा श्री.गो.से. हायस्कूलमध्य कडुन सन्मान
पाचोरा दि.२२ (प्रतिनिधी राजेंद्र खैरनार)येथील श्री.गो.से. हायस्कूलमधील सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेची माजी विद्यार्थिनी कु.वैष्णवी मनीष काबरा हिला संस्थेचे व्हाइस चेअरमन व्ही.टी.जोशी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या शुभ प्रसंगी व्ही.टी. जोशी यांनी वैष्णवी हिला सन्मानित करतांना शाळेमधील इ. विद्यार्थ्यांनी पण तीचा आदर्श आपणासमोर ठेवून चांगल्या प्रकारे यश संपादित करावे अशी आशा व्यक्त केली. कु.वैष्णवी काबरा हीचे वडील श्री.मनीष काबरा आणि आई सौ.वैशाली काबरा यांचा पण सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक श्री.सुधीर पाटील,उपमुख्याध्यापिका श्रीमती प्रमिला वाघ, पर्यवेक्षक श्री.एन.आर.पाटील, श्री.आर.एल. पाटील, श्री.ए.बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख श्री.शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री.मनिष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.बी.तडवी, कार्यालयीन अधीक्षक श्री.अजय सिनकर यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार भाऊसाहेब श्री.दिलीपभाऊ वाघ, चेअरमन नानासाहेब श्री.संजय वाघ, शालेय समितीचे चेअरमन खालील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन श्री.वासुदेव महाजन यांनी पण कु.वैष्णवी काबरा हिचे अभिनंदन केले आहे.