महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाने नाशिक भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा महानगरच्या वतीने जल्लोष......

 




महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाने  नाशिक  भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा महानगरच्या वतीने जल्लोष...... 

        नाशिक दि.२३(प्रतिनिधी):- देशाच्या 15 व्या राष्ट्रपती पदी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार माननीय द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल नाशिक येथे भाजपाचे वसंत स्मृती कार्यालय येथे भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा आणि सर्व भाजपच्या आघाडांच्या वतीने जल्लोष करुन विजयोत्सव साजरा करण्यात आला. भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वसंत स्मृती या भाजपच्या कार्यालयात एकत्र येऊन ढोल ताशांच्या गजरात, फटाके वाजवत, एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. 

       हा विजय संपूर्ण देशात जनतेचा विजय असून एका सामान्य कुटुंबातील तेही आदिवासी व देशातील सर्वात दुर्लक्षित आदिवासी समुदायातील  व विशेषतः एक महिला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदी या पदावर विराजमान होत आहेत. याचा आम्हाला विशेष अभिमान होत आहे. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष मा गिरीशभाऊ पालवे,  आमदार मा देवयानीताई फरांदे, अनुसूचित जनजाती मोर्चाचे शहराध्यक्ष प्रा परशुराम वाघेरे सर, उपाध्यक्ष श्री युवराज सैंदाणे, सरचिटणीस श्री रविंद्र शेळके आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व  शहर आणि जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने