चोपडा शहरातील भाट गल्ली येथील ५५ वर्षी इसम बेपत्ता..पोलिसांत संपर्क साधण्याचे आवाहन


चोपडा शहरातील भाट गल्ली येथील ५५ वर्षी इसम बेपत्ता..पोलिसांत संपर्क साधण्याचे आवाहन

चोपडा दि.२३(प्रतिनिधी) : सोमेश्वर भरत माळी वय २४ धंदा.स्पेअर पार्ट दुकान रा.भाट गल्ली चोपडा ता.चोपडा जि.जळगांव यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला खबर दिली कि माझे वडील भरत तुकाराम माळी वय.५५ मु.पो.भाट गल्ली चोपडा ता.चोपडा जि.जळगाव २०/०७/२०२२ रोजी सध्याकाळी ०६.०० वाजे नंतर चोपडा शहरातील राहते घर भाट गल्ली, चोपडा येथुन बाजारात जाऊन येतो असे सांगून निघून गेले असुन ते अद्याप पावेतो घरी परत आले नाही.तसेच हरवलेल्या व्यक्तीचा शोध नातेवाईक घेत असतांना चोपडा ते सावखेडा रोडवरील तापी नदीच्या पुलावर हरवलेल्या व्यक्तीचे पायातील प्लास्टिकचे काळे बुट व व्हिजिटिंग कार्ड सदर ठिकाणी मिळुन आले असुन सदर हरवलेल्या व्यक्तीचा शोध नातेवाईक घेत आहे.सदर इसमाची ओळख भरत तुकाराम माळी वय.५५ भाट गगल्ली ता.चोपडा जि.जळगाव शरीराने मध्यम विरल डोक्यावर टक्कल असुन विरळ पांढरे केस, डोळे काळे नाक सरळ , मिशी पांढरी केस असलेली,डोळ्यावर नजरेचा चष्मा,अंगात एक फुल बाहीचा शर्ट व राखाडी रंगांची सुटपँन्ट तसेच पायात प्लॅस्टिकचा काळा हापबुट व उजव्या हातात पाढऱ्या धातुची चांदीची अंगुठे तसेच दोन्ही हातांचे बोटावर व पायावर पांढरे चट्टे व उजव्या हातांचे पंजावर ओम गोधंलेले आहे.चोपडा शहर पोलीस स्टेशनला मिसिंग रजि.नं.३६/२०२२ प्रमाणे  दाखल करण्यात आला आहे.सदर व्यक्ती आढळून आल्यास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण व पोना किरण गाडीलोहार यांचेशी संपर्क साधावा,मो.८९७५८९३५८१,पो.स्टे.०२५८६.२२०३३३ असे आव्हान करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने