*पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावी व बारावीचा निकाल शंभर टक्के.....*
चोपडा दि.२४( प्रतिनिधी ):--सी.बी.एस.ई. बोर्डाचा नुकताच इयत्ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर केला आहे. त्यात चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात इयत्ता बारावीत प्रथम अथर्व सुभेदार ९४.८० %. द्वितीय प्रेरणा गायकवाड ९२.८० % . तृतीय अनघा पाटील ९१.६० % तसेच इयत्ता दहावीत प्रथम विद्यार्थी अरविंद शेखावत ९५.७ % , द्वितीय आशुतोष अग्रवाल ९५%, तृतीय क्रमांक कृष्णा बाहेती ९४.६० % मिळाले आहे.
इयत्ता बारावीतील ४५ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थ्यांना ८५ % पेक्षा अधिक गुण मिळाले आहे. चार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहे. इयत्ता दहावीतील ६२ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, संचालक नारायण बोरोले, भागवत भारंबे, गोकुळ भोळे ,पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील, पंकज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, पंकज कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमोडे, पंकज बाल संस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पाटील, पंकज इंग्लिश मीडियम चे प्राचार्य संदीप वन्नेरे आदींनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत...
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य मिलिंद पाटील, वस्तीगृहप्रमुख के. पी. पाटील, समन्वयक किरण चौधरी, इब्राहिम तडवी, शुभांगी साबळे, स्वाती पाटील, भाग्यश्री बारी आदींचे मार्गदर्शन लाभले.