अनेर काठ संघर्ष आणि निर्माण समितीतर्फे उपविभागीय अभियंता यांना निवेदन
गलंगी दि.०२(प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी): गलंगी (अनेर) बस स्टंड ते अनेर नदी, पुला पर्यंत, रस्ता खुपच खराब झाला आहे. गेल्या च, वर्षी या रस्त्याची, दुरूस्ती झाली होती, पण निष्कृष्ट कामा मुळे रस्ता, खराब झाला आहे. या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी. नाहीतर अनेर काठ संघर्ष आणि निर्माण समिती ला तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे
यावेळी अनेर काठ संघर्ष आणि निर्माण समिती संयोजक प्रा प्रदीप पाटील, के.डी. चौधरी सर,लक्ष्मण कविरे,मेहबूब तेली,रमाकांत सोनवणे, बंकार पावरा,प्रकाश पाटील,राजेंद्र पाटील, चेतन बाविस्कर, गोपाल नायदे,लक्ष्मण काविरे आदी उपस्थित होते